Redmi 12 5G: 40 लाख लोकांनी खरेदी केला हा 10 हजारांच्या आत येणारा 5G Phone; जाणून घ्या फीचर्स

Redmi 12 5G फोननं भारतात विक्रमी विक्री केली आहे. जर हा फोन कंपनीचा सर्वात हिट फोन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फोन ऑगस्ट 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. लाँच नंतर पहिल्याच आठवड्यात याचे 3 लाख यूनिट्स विकले गेले होते. आता भारतात देखील या फोननं नवीन रेकॉर्ड सेट केला आहे. कंपनीनं भारतात Redmi 12 5G फोन वापर करणाऱ्याची आकडेवारी जारी केली आहे, जी थक्क करणारी आहे.

Redmi 12 5G भारतात पॉपुलर 5G स्मार्टफोन ठरला आहे. Xiaomi नं अधिकृतपणे या फोनच्या भारतीय युजर्सची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार, Redmi 12 5G चे भारतात 40 लाख युजर्स आहेत. Facebook वर एक पोस्टच्या माध्यमातून कंपनीनं हा माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, या लोकप्रियते मागे परवडणारी किंमत हे सर्वात मोठे कारण आहे. हा सर्वात अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच डिजाइन आणि लुकमुळे देखील हा लोकांना आवडत आहे.
8GB रॅम असलेल्या स्वस्त Oppo A3 Pro येतोय भारतात; लाँच पूर्वीच किंमत लीक

Redmi 12 5Gची किंमत

Redmi 12 5G ची किंमत पाहता याचा 4GB रॅम व 128GB व्हेरिएंट 9,999 रुपयांमध्ये येतो. फोनचा 8GB रॅम व 128GB व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये येतो. आणि टॉप व्हेरिएंट 8GB रॅम व 256GB कॉन्फिगरेशनमध्ये 12,999 रुपयांमध्ये Amazon वरून विकत घेता येईल.
undefined

Redmi 12 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Redmi 12 5G स्मार्टफोन 6.79 इंचाच्या फुलएचडी प्लस डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Glass चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑपरेटिंग सिस्टम Android 13 आधारित MIUI 14 आहे. Redmi 12 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आहे. स्मार्टफोनमध्ये मागे 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.

याची बॅटरी कपॅसिटी 5000mAh आहे, त्याचबरोबर 18W फास्ट चार्जिंग आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये WiFi, GPS, Bluetooth, v5.0, NFC, आणि USB Type-C चा सपोर्ट मिळतो. तसेच यात 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. यात IP53 रेटिंग आहे, ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून काही प्रमाणात बचाव होतो.

Source link

5g phone under 10kRedmiRedmi 12 5Gरेडमीरेडमी फोनरेडमी १२ ५जीस्वस्त ५जी फोन५जी फोन
Comments (0)
Add Comment