लखनऊ: उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात ओयो हॉटेलच्या खोलीत तरुण, तरुणीचे मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत, तर तरुणीचा मृतदेह बेडवर आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि अन्य कर्मचारी हॉटेलवर पोहोचले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पुरावे गोळा केले. यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
दिल्लीच्या गौतमनगरमध्ये राहणारा २० वर्षीय तरुण आणि संभलमध्ये राहणारी २३ वर्षीय तरुणी गुरुवारी दुपारी मोहल्ला फतेहुल्लाह सराय येथील ओयो हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी तिथे रुम बुक केली. हॉचेलच्या व्यवस्थापकानं दोघांची ओळखपत्रं तपासून त्यांना रुम दिली. रात्री ११ वाजता ते चेक आऊट करणार होते. रात्री ११ नंतर हॉटेल व्यवस्थापक अमितनं रुमचं दार ठोठावलं. पण आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यवस्थापकाला संशय आला. त्यानं शिडी लावली आणि खिडकीतून आत डोकावून पाहिलं. तेव्हा त्याला तरुण गळफास लावलेल्या स्थितीत, तर तरुणी बेडवर निपचित पडलेली दिसली.
व्यवस्थापकानं झाल्या प्रकाराची माहिती तातडीनं पोलिसांना दिली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीचंद्र घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व्यवस्थापकाकडून अधिकची माहिती घेतली. घटनेबद्दल समजताच पोलीस अधीक्षक कुलदीप सिंह गुनावतही फॉरेन्सिकच्या पथकासह हॉटेलमध्ये पोहोचले. मृतांच्या ओळखपत्रांच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
प्राथमिक तपासानुसार, तरुणाचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाला आहे. तर तरुणीच्या तोंडातून सफेद फेस असल्याचं आढळून आलं आहे. तिनं विषारी पदार्थ खाल्ला असावा असा संशय आहे. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे. प्रथमदर्शनी हा प्रकार आत्महत्येचा वाटत आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.