लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात एका तरुणाचं लिंग परिवर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांशी संधान साधून एकानं स्वत:च्याच सहकारी तरुणाचं लिंग परिवर्तन केलं. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आरोपी व्यक्ती आणि डॉक्टरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन केलं. मंसूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेगराजपूर वैद्यकीय रुग्णालयात ही घटना घडली.
सांझक गावचा रहिवासी असलेल्या २० वर्षीय मुजाहिला ओमप्रकाश नावाचा व्यक्ती ३ जूनला सोबत घेऊन गेला. ओमप्रकाशनं वैद्यकीय महाविद्यालयाशी संधान साधून मुजाहिदवर शस्त्रक्रिया केली. ओमप्रकाशनं मुजाहिदचं गुप्तांग कापून त्याला न सांगताच त्याचं लिंग परिवर्तन केलं. ‘ओमप्रकाश गेल्या दोन वर्षांपासून धमक्या देऊन माझ्यासोबत गैरकृत्य करत होता. आता त्यानं रुग्णालयात माझं ऑपरेशन केलं,’ अशी व्यथा मुजाहिदनं मांडली.
आता तू मुलगी झाला आहेस. त्यामुळे आता आपण लग्न करु शकतो, असं ओमप्रकाश शस्त्रक्रियेनंतर मला म्हणाला, असं पीडित मुजाहिदनं सांगितलं. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी केली. आरोपी ओमप्रकाश आणि डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या आवारात अनेक तास आंदोलन केलं. पोलिसांची समजूत काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं.
वैद्यकीय महाविद्यालयात एका व्यक्तीची लिंग परिवर्तन शस्त्रस्क्रिया करण्यात आल्याचं सर्कल ऑफिसर रामाशिष यादव यांनी सांगितलं. दिशाभूल करुन तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं यादव म्हणाले.