गुरुवारी दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या केजरीवालांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला होता. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी अत्यंत घाईने त्यांच्या जामिनाला विरोध करणारी याचिका दिल्ली उच्चन्यायालयात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने केजरीवालांच्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावर सुनिता केजरीवाल यांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाल्या सुनिता केजरीवाल ?
राउज अव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ईडीने तात्काळ घेतलेल्या हरखतीवर बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या जामिनाचा आदेश अपलोड होण्यापूर्वीच ईडी निर्णयाविरोधात या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात पोहोचली. ते असं वर्तन करत आहेत जसं काही केजरीवाल हे एक फरार दहशतवादी आहेत. परंतु अध्याप उच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. आम्ही आशा करतो की उच्च न्यायालय योग्य न्याय करेल. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवालांनी तुरुंगातून दिलेला संदेशही सर्वांना सांगितला. त्यांनी पुढे म्हटले की शेजारच्या दिल्ली राज्याला पाणी सुद्धा देत नाही आहेत. ही वेळ सध्या या मुद्यावर राजकारण करण्याची आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीतील राउज एव्हेन्यु कोर्टाने दिलेल्या जामिनानंतर केजरीवाल यांना शुक्रवारी जामिन मिळणार होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी उच्च न्यायालयात विरोध केला. सुनावणीनंतर केजरीवालांच्या जामिनाला न्यायालयाने स्थगिती दिली.
सुनावणी दरम्यान काय घडले ?
ईडीचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की कनिष्ठ न्यायालयाने आमचे म्हणणे न ऐकल्याने आम्हाला तात्काळ स्थगिती हवी आहे. काल आठ वाजता निर्णय दिला होता तरीही अंतिम आदेश अध्याप अपलोड करण्यात आलेला नाही. याविरोधात केजरीवालांकडून जेष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांचा हवाला देत सांगितले की,जामिन देणे हे जामिन रद्द करण्याशी पूर्णता भिन्न असते. शेवटी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने प्रकरणाची संपूर्ण सुनावणी होईपर्यंत जामिनाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला.
लोकसभा निवडणूकांदरम्यान अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी २१ दिवसांचा जामिन प्रदान केला होता. निवडणूकीचा व जामिनाचा कालावधी संपताच ते 2 जून रोजी ते पुन्हा तुरुंगात हजर झाले होते.