ब्लूटूथ स्पीकर म्हणूनही वापरता येईल हा टॅबलेट, Lenovoने लाँच केले नवीन दमदार मल्टीटास्किंग डिवाइस

Lenovoच्या या टॅबलेटमध्ये मीडियाटेक हीलियो G99 चिपसेट आहे, ज्यामुळे युजर एक्सपीरियन्स अत्यंत स्मूद होतो. हा टॅबलेट अँड्रॉइड 14 वर चालतो, त्यामुळे यूजर्सना लेटेस्ट फीचर्सचा लाभ घेता येईल. यामध्ये 8,600 mAh बॅटरी आहे, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत तो युज करता येईल. याचबरोबर, 45W वायर फास्ट चार्जिंग सपोर्टदेखील आहे, त्यामुळे या टॅबलेटची बॅटरी झटपट चार्ज होते.

Lenovo Tab Plusची किंमत आणि उपलब्धता

सध्या Lenovo Tab Plus ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 279 युरो (सुमारे 25,000 रुपये) किंवा 28 9.99 डॉलर्स (सुमारे 24,200 रुपये) आहे. हा टॅबलेट सिंगल लूना ग्रे शेडमध्ये उपलब्ध आहे याशिवाय तो दोन RAM आणि स्टोरेज ऑप्शन्समध्ये येतो, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या आवश्यकतांनुसार निवड करता येईल. 11.5 इंच 2K LCD स्क्रीनसह, यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे व्हिज्युअल एक्सपीरियन्स आणखी दमदार होईल.

स्पेसिफिकेशन्स

या टॅबलेटमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे, उत्तम साऊंड फीचरमुळे हा टॅबलेट एक मल्टीटास्किंगसाठी डिवाइस ठरणार आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो ऑटोफोकससह येतो. स्पीकर्सच्या बाबतीत, या टॅबलेटमध्ये JBLचे आठ स्पीकर्स आहेत, ज्यामुळे ऑडिओ एक्सपिरियन्स अप्रतिम होईल. युजर्स यासोबत इतर फोनचे ब्लूटूथ देखील वापरू शकतात.

भारतात लॉन्च होणार का?

Lenovoने अद्याप हा टॅबलेट भारतात लॉन्च होणार की नाही याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, ग्लोबल मार्केटमध्ये याची लोकप्रियता पाहता, लवकरच हा टॅबलेट भारतात देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा टॅबलेट अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.

Lenovoचा नवीन टॅबलेट अत्याधुनिक फीचर्ससह येतो आणि याच्या स्पेसिफिकेशन्स पाहता, हा टॅबलेट लवकरच युजर्समध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. JBLचे आठ स्पीकर्स, 11.5 इंच 2K LCD स्क्रीन आणि मीडियाटेक हीलियो G99 चिपसेटसह, हा टॅबलेट एक संपूर्ण पॅकेज आहे, जे युजर्सला दर्जेदार अनुभव देईल.

Source link

enovo tab plus multitasking bluetooth speakerg bluetooth speaker specs and pricelenovo bluetooth speakerlenovo tab pluslenovo tablet
Comments (0)
Add Comment