Oppo A3 Pro ची किंमत आणि ऑफर्स
Oppo A3 Pro चे दोन मॉडेल भारतात लाँच झाले आहेत. यातील 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेजसाठी ग्राहकांना 19,999 रुपये मोजावे लागतील. हा स्मार्टफोन मुनलाइट पर्पल आणि स्टारी ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. हा फोन अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, ओप्पो ई-स्टोर आणि ऑफलाइन स्टोर्समध्ये उपलब्ध होईल.
कंपनीनं Oppo A3 Pro वर काही लाँच ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. एचडीएफसी, एसबीआय, आयडीएफसी, येस बँक आणि आयसीआयसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना 10% इन्स्टंट कॅशबॅक दिला जाईल. हा फोन 6 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल.
Oppo A3 Proचे स्पेसिफिकेशन्स
Oppo A3 Pro मध्ये कंपनीनं 6.7 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2412 पिक्सल आहे. ही स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 950 नीट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते.
प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात ऑक्ट-कोर MediaTek Dimensity 7050 चिपसेटचा वापर केला आहे. सोबतीला 8GB पर्यंत रॅम व 256GB पर्यांतची स्टोरेज मिळते. वर्चुअली रॅम वाढण्याचा पर्याय देखील कंपनी देत आहे. त्यामुळे एकूण 12GB रॅमची ताकद देखील हा फोन देऊ शकतो.
Oppo A3 Pro ड्युअल सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉइड 14 आधारित कंपनीच्या ColorOS 14 वर चालतो. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतीला 2MP चा डेप्थ सेन्सर देखील पाहायला मिळतो. तर फ्रंटला कंपनीनं 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आला आहे. तर धूळ आणि पाण्यापासून वाचण्यासाठी यात IP68 रेटिंग देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी यात 5000mAh ची मोठी बॅटरी पाहायला मिळते. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.