Gigabyte AORUS 16X चे स्पेसिफिकेशन
Gigabyte AORUS 16X मध्ये 16 इंचाचा WQXGA डिस्प्ले आहे. ज्याचे रिजोल्यूशन 2560 x 1600 पिक्सल, रिफ्रेश रेट 165Hz आणि अॅस्पेक्ट रेश्यो 16:10 आहे. हा Dolby Vision ला सपोर्ट करतो. यात Intel core i9-14900HX प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 4070 जीपीयू देण्यात आला आहे. सोबत 64GB ड्युअल-चॅनेल रॅम आणि 4TB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
या लॅपटॉपमध्ये 99WHr ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एचडीएमआय 2.1, यूएसबी टाईप-ए आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड आणि ऑडियो जॅक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर Dolby Atmos, IR वेबकॅम आणि स्मार्ट अँप टेक्नॉलॉजी मिळते.
Gigabyte G6Xचे फीचर्स
Gigabyte G6X मध्ये 16 इंचाचा WUXGA डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1920×1200 पिक्सल, अॅस्पेक्ट रेश्यो 16:10 आणि रिफ्रेश रेट 165Hz आहे. फास्ट वर्किंगसाठी लॅपटॉपमध्ये 64GB DDR5 4800MHz ड्युअल-चॅनेल रॅम आणि 4TB इंटरनल स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये Intel core i7-13650HX प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 4060 जीपीयू देखील मिळतो.
गीगाबाइटचा हा लॅपटॉप विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या लॅपटॉपमध्ये 73WHr ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी टाईप-ए यूएसबी, ऑडियो जॅक, यूएसबी टाईप-सी, यूएसबी टाईप-ए, एचडीएमआय 2.1 आणि आरजे-45 पोर्ट्स देण्यात आले आहेत. तसेच Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ 5.2 चा सपोर्ट देखील आहे. लॅपटॉपमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि एचडी वेबकॅम देण्यात आला आहे.
Gigabyte AORUS 16X आणि G6X ची किंमत
Gigabyte AORUS 16X ची किंमत 96,999 रुपयांपासून सुरु होते. तसेच, AORUS G6X लॅपटॉप 1,89,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत उपलब्ध आहे. हे दोन्ही लॅपटॉप मिडनाइट ग्रे आणि ऑरा ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यांची विक्री जुलैपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोरवर सुरु होईल.