चार यूट्यूबर्सच्या मृत्यूची बातमी खोटी निघाली; चौघांपैकी तिघे जिवंत, काय घडलं ‘त्या’ रात्री?

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये रस्ते अपघातात ४ यूट्यूबर्सचा मृत्यू झाल्याची बातमी ९ जूनला समोर आली. पण त्या चौघांपैकी तीन जण जिवंत असल्याची माहिती आता उघडकीस आली आहे. अपघातात आमच्या एका मित्राचा मृत्यू झाल्याचं तिघांनी सांगितलं. लकी असं मृताचं नाव आहे. अन्य तिघे मात्र सुरक्षित आहेत. यूट्यूब राऊंड २ वर्ल्डमध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या सलमाननं या अपघाताची पूर्ण कहाणी सांगितली. सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यात तथ्य नाही, असं सलमाननं सांगितलं.

ज्या कारचा अपघात झाला, त्यात लकी एकटाच होता. बाकीचे तीन मित्र दुसऱ्या कारमध्ये होते, अशी माहिती सलमाननं दिली. अमरोहाच्या हसनपूरमध्ये एका वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी आम्ही गेलो होतो. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु होती. तिथून परतत असताना कारला अपघात झाला. यानंतर सोशल मीडियावर राऊंड २ वर्ल्ड टीमच्या सलमानसह त्याच्या ३ मित्रांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. रस्ते अपघातात आमचा मित्र लकीचा मृत्यू झाला. तो राऊंड २ वर्ल्ड टीमचा भाग होता, असं सलमाननं सांगितलं.
CM, मंत्री, आमदारांचा पगार वाढला; तुमच्या अप्रेझलपेक्षा कैकपट अधिक वाढ, आकडे पाहाच
अपघाताची माहिती मला लकीच्या भाऊजींनी दिली. बातमी मिळताच मी अपघातस्थळी पोहोचले. त्यावेळी लकी कारमध्ये अडकला होता. आम्ही तिथे असलेल्या लोकांना रुग्णवाहिका मागवण्यास सांगितलं. पण कोणीही आम्हाला मदत केली नाही, असा घटनाक्रम सलमाननं कथन केला. ‘राऊंड २ वर्ल्ड टीम’मध्ये ४ मुख्य व्यक्तीरेखा आहेत. यातील सलमान प्रमुख व्यक्तीरेखा आहे. तर अनस, लकी, शहजान अन्य तीन भूमिकेत दिसतात. राऊंड २ वर्ल्ड एक यूट्यूब चॅनल आहे. त्यासाठी सलमान आणि त्याचे साथीदार कॉमेडी व्हिडीओ तयार करतात. त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे २.०६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

Source link

round 2 worlduttar pradeshyoutube channelyoutubers death newsउत्तर प्रदेशयूट्यूबर्सचा मृत्यूराऊंड २ वर्ल्ड
Comments (0)
Add Comment