अॅप्पल वॉचने कसे वाचवले बीजेपी नेत्याचे प्राण?
युजर्स आपले रूटीन आणि हेल्थ ट्रॅक करण्यासाठी स्मार्टवॉचचा वापर करतात. अॅप्पल वॉच ही सामान्य स्मार्टवॉचच्या तुलनेत महाग असते, त्यामुळे ती वापरणारे युजर्स खूप कमी असतात. परंतु, अॅप्पल वॉचच्या फीचर्स इतके प्रभावी आहेत की, त्यामुळे परदेशात अनेक युजर्सचे प्राण वाचले आहेत. आता भारतातही तेलंगणातील बीजेपी नेते प्रताप रामकृष्ण यांचे प्राण या अॅप्पल वॉचमुळे वाचले आहेत.
त्रासाकडे केले दुर्लक्ष
तेलंगणाच्या राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील बीजेपी नेते प्रताप रामकृष्ण नेहमीप्रमाणे आपले कामकाज करत होते. अचानक एके दिवशी चार पावले चालल्यानंतर त्यांना थकवा जाणवू लागला आणि छातीत जळजळ देखील होऊ लागली. त्यांनी त्यावेळी विचार केला की, हे गॅसचे कारण असू शकते आणि त्यांनी याकडे विशेष लक्ष दिले नाही. परंतु, काही वेळाने अॅप्पल वॉचने त्यांना सीरियस हेल्थ इश्यूचे नोटिफिकेशन दिले. त्यानंतर त्यांनी त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी केली.
रुग्णालयात हार्ट ब्लॉकेजचे निदान
बीजेपी नेते प्रताप रामकृष्ण यांनी अॅप्पल वॉचच्या नोटिफिकेशनवरून रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यांनी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात त्वरित उपचार घेतले आणि सध्या ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.
हा अनुभव सांगतो की, टेक्नोलॉजीच्या मदतीने आपल्या जीवाचा धोका कसा टाळता येऊ शकतो आणि हे कसे आपल्यासाठी एक वरदान ठरू शकते.