विशेष म्हणजे लाँच झाल्यावर Moto S50 Neo हा जगातील पहिला स्मार्टफोन ठरेल ज्यावर 4 वर्षांची वॉरंटी मिळेल. प्रमोशनल पोस्टरमध्ये छोट्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे की या वॉरंटीमध्ये 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी मिळेल आणि 3 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी दिली जाईल.
याआधी शाओमी, वनप्लस, लेनोवो आणि इतर काही कंपन्यांनी 2 वर्षांची वॉरंटी दिली होती. तर Meizu च्या 20 आणि 21 सीरिज सोबत 3 वर्षांची वॉरंटी प्रेशनल ऑफर्सच्या वेळी दिली जाते. परंतु Motorola S50 Neo मात्र नवीन 4 वर्षांची वॉरंटी देऊन इंडस्ट्रीमध्ये नवा पायंडा घालून देत आहे.
Moto S50 Neo वर एक्सटेंडेड वॉरंटी कशी मिळवता येईल याबाबत कंपनीनं अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. या वाढीव वॉरंटीमुळे 4 वर्षात फोनला काही झालं तरी ग्राहकांना जास्त काळजी करावी लागणार नाही, त्यामुळे ग्राहक या फोनला पसंती देतील अशी कंपनीची अपेक्षा असावी. रिपोर्ट्सनुसार जागतिक बाजारात S50 Neo स्मार्टफोन Moto G85 5G म्हणून लाँच केला जाईल. परंतु G85 सोबत 4 वर्षांची वॉरंटी मिळणे कठीण आहे. सध्या हा फायदा फक्त चीन पुरता मर्यादित राहू शकतो.
Moto S50 Neo चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रिपोर्टनुसार Moto S50 Neo मध्ये 6.6 इंचाचा OLED कर्व्ह एज स्क्रीन मिळेल, जी फुल एचडी+ रिजोल्यूशन मिळेल आणि सोबत 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. यात एक अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगनचा मिडरेंज चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 5000mAh ची बॅटरी देखील मिळेल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा फोन फक्त 7.59mm इतका जाड असू शकतो. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये लेटेस्ट Android 14 ऑपरेटिंग सिस्टम दिली जाऊ शकते. मोबाइल ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू शेड्समध्ये लाँच होऊ शकतो.