स्विमिंग पूलमधून बाहेर पडला, चालता-चालता कोसळला, १५ वर्षांच्या समीरचा अचानक मृत्यू

मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना एका १५ वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत मुलाचं नाव समीर असून तो मेरठच्या सिवालखास येथील राहणारा होता. तो त्याच्या मित्रांसोबत स्विमिंग पूलमध्ये पोहायला आला होता. तो स्विमिंग करुन पूलच्या बाहेर आला आणि चालता चालता बेशुद्ध होऊन कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ही घटना स्विमिंग पूलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, समीर हा पूलमधून बाहेर आला आणि चालता चालता तो अचानक जमिनीवर कोसळला. तिथे उपस्थितांनी त्याला उचललं आणि रुग्णालयात नेलं. समीरचा मृत्यू हार्ट फेल किंवा हार्ट अटॅकने झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरची तब्येत बरी नसल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे.

समीर हा बराच वेळापासून स्विमिंग पूलमध्ये पोहत होता. पण, बाहेर येताच तो अचानक कोसळला, त्यानंतर तो उठलाच नाही, अशी माहिती उपस्थितांनी पोलिसांना दिली. सध्या पोलिस याप्रकरणात तपास करत आहे. समीरचा मृत्यू हार्ट फेल किंवा हार्ट अटॅकने झाला असल्याचा प्राथमिक संशय आहे.

Source link

boy dies after swimmingheart attackmeerut uttar pradeshminor boy dies at swimming poolyoung boy died at swimming poolउत्तर प्रदेश न्यूजस्विमिंग पूलहार्ट अटॅक१५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment