Mangal Gochar in Vrishabh Rashi :
शौर्य, युद्ध आणि नेतृत्वाचा कारक असलेला मंगळ ग्रह १२ जुलैला शुक्रवारी वृषभ राशीत गोचर करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार वृषभ राशीत आधीपासूनच देवगुरू गुरू ग्रह आहे. त्यामुळे वृषभ राशीत गुरू आणि मंगळ ग्रहाची युती होईल. मंगळ ग्रह या राशीत ४६ दिवस राहील त्यानंतर २६ ऑगस्टला मंगळ ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. मेष आणि वृश्चिकचा राशीचा स्वामी असलेला मंगळ जेव्हा राशिपरिवर्तन करतो, तेव्हा त्याचा प्रभाव देश, जग, अर्थव्यवस्था आणि सर्व १२ राशींवर पाहायला मिळतो. दरम्यान या लेखात आपण अशा राशींवर बोलणार आहोत, ज्या राशींना या गोचरचा लाभ होणार आहे. तर जाणून घेऊ मंगळ ग्रहाचे वृषभ राशीतील गोचर यामुळे कोणत्या राशींचा लाभ होणार आहे.
1. मंगळ ग्रहाचा मेष राशीवर प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीत दुसऱ्या स्थानी परिवर्तन करणार आहे. या काळात सुखसुविधांत वाढ होईल आणि तुम्ही मौजमजेच्या वस्तूंवर भरपूर खर्च कराल. आध्यात्मिक विषयांत तुमची रुची वाढेल, तसेच कुटुंबीय, जोडीदार यांच्यासोबत धार्मिक यात्रेला जाल. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना या काळात बऱ्याच संधी मिळतील आणि तुम्हाला कामातून समाधान मिळेल. जोडीदारा आणि कुटुंबीयांसोबत तुमचे् संबंध चांगले राहतील आणि प्रकृतीच्या समस्या दूर होतील.
2. मंगळ ग्रहाचा वृषभ राशीवर प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीत लग्नभावात म्हणजे पहिल्या स्थानी गोचर करणार आहे. तुम्हाला व्यावासायिक जीवनात येत असलेले अडथळे दूर होतील, तसेच व्यवसायात चांगला लाभ मिळवण्याच्या रणनीतीवर तुम्ही काम कराल. जर तुमचे पैसे कोठे अडकले असतील तर ते परत येण्याची शक्यता आहे. सासरच्या नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील, आणि तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही एकमेकांच्या भावनांचा सन्मान कराल.
3. मंगळ ग्रहाचा सिंह राशीवर प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीत १०व्या स्थानी गोचर करत आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांसाठी उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्ही नवा व्यवसाय सुरू करू शकता. नोकरदार व्यक्तींसाठी करिअरमध्ये प्रगतीच्या सुवर्णसंधी मिळतील, तसेच तुम्हाला विविध कंपन्यांकडून उत्तम पगाराच्या ऑफर येतील. या काळात संपत्ती किंवा वाहन खरेदीची तुमची इच्छा पूर्ण होईल. उत्पन्नाच्या बाबतीत तुम्ही नशिबवान राहाल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या पूर्ण कराल. धार्मिक कार्यात मन लागेल.
4. मंगळ ग्रहाचा कन्या राशीवर प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीत नवव्या स्थानी परिवर्तन करत आहे. या काळात कन्या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. विविध मार्गांतून धनप्राप्ती होईल आणि धनसंचय कराल. करिअरमध्ये नवी उंची गाठाल. कुटुंबासोबत काही वाद सुरू असतील तर ते या काळात संपून जातील. घरी शुभकार्याचे अयोजन होईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेले पैसे हाती येतील. जीवनशैलीत सुधारणा होईल.
5. मंगळ ग्रहाचा तूळ राशीवर प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीत आठव्या स्थानी गोचर करत आहे. या काळात तुम्हाला वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात फार चांगल्या संधी मिळतील आणि धनप्राप्तीचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. नोकरशी संबंधित लोकांना पगार वाढ मिळेल आणि व्यापाऱ्यांना धनप्राप्ती चांगली राहील. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे नेतृत्व क्षमतेचा विकास पाहायला मिळेल. मान, प्रतिष्ठा आणि यश यात वाढ होईल. जोडीदारासोबत आनंदी वातावरण ठेवण्यात यशस्वी व्हाल.
6. मंगळ ग्रहावर धनू राशीचा प्रभाव
मंगळ ग्रह तुमच्या राशीला सहाव्या स्थानी गोचर करत आहे. या काळात धनू राशीच्या लोाकंना चांगले मित्र मिळतील आणि भावाबहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरदारांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे, आणि तुम्ही स्वतःसाठी नवे स्थान प्राप्त कराल. तुमच्या धाडसी वृत्ती राहली आणि निर्णयक्षमतेचा विकास होईल. व्यापाऱ्यांना लाभ होतील आणि प्रगती होईल. इतर व्यवसायात गुंतवणूक करू शकता.