मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं शिर हे एमआरएफ कंपनीजवळ धतवाडा-उस्गाव रोडजवळ सापडलं आहे. ट्रक चालकाला या घटनेबाबत तेव्हा माहिती झालं जेव्हा पोलिसांनी त्याला सांगितलं. तो घटनास्थळावरुन पुढे निघून गेला आणि त्याने उस्गाव रबर कारखान्यात ट्रक पार्क केला.
भरधाव वेगातील ट्रकची धडक, शरीराचे दोन तुकडे
घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी स्वत: आपल्या डोळ्यांनी हा अपघात पाहिला आहे. भरधाव वेगात असलेला ट्रक पादचाऱ्याला धडक देऊन पुढे निघून गेला. ती व्यक्ती तेव्हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.
मृत व्यक्तीचं नाव आनंद धर्म नाईक असल्याची माहिती आहे. ५७ वर्षीय आनंद नाईक हे पोंडा येथील रहिवासी होते. प्राथमिक तपासात हे हिट अँड रनचं प्रकरण असल्याचं दिसून येत आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास करण्यात आला. त्याआधारे या ट्रकपर्यंत पोलिस पोहोचले. हा ट्रक रबर कारखान्याच्या आत जात असल्याचं दिसून आलं. या ट्रकमध्ये रबर होतं, जे ट्रकमधून हे रबर टायर कारखान्यात पोहोचवलं जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याचं नाव धन्ना नाथ जोगी (वय ६६) असल्याची माहिती आहे. तो राजस्थानच्या उदयपूर येथील राहणारा आहे. पोलिसांनी अपघात झालेला ट्रकही ताब्यात घेतला आहे.