फ्लिपकार्ट लवकरच क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये एंट्री करू शकते. कंपनी आपली नवीन सर्व्हिस सुरू करू शकते, जी 15 मिनिटांत लोकांपर्यंत वस्तू पोहोचवेल. ब्रँडने यापूर्वीच अशा सेवा सुरू केल्या होत्या. मात्र, त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही.
फ्लिपकार्ट लवकरच सुरू करू शकते Flipkart minutes सर्व्हिस
फ्लिपकार्ट भारतात आपले क्विक कॉमर्स व्हर्टिकल लॉन्च करू शकते. त्याचे नाव Flipkart Minutes असेल, जे जुलैमध्ये लाँच केले जाऊ शकते. बिझनेस टुडेने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच फ्लिपकार्टच्या क्विक कॉमर्समध्ये प्रवेश करण्याबाबत अटकळ होती. क्विक कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा फ्लिपकार्टचा हा तिसरा प्रयत्न असेल. कंपनीने अद्याप फ्लिपकार्ट मिनिट्सबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासून, कंपनी लवकरच क्विक कॉमर्समध्ये प्रवेश करेल अशी अटकळ होती. विशेषत: झेप्टोसोबत कंपनीचा करार अंतिम होऊ न शकल्यानंतर त्याची चर्चा वाढली होती.
याआधी Flipkart चे दोन प्रयत्न
याआधी, कंपनीने गेल्या काही वर्षांत दोन प्रयत्न केले होते, ज्यात त्यांना फारसे यश मिळाले नव्हते. Blinkit, Zepto, BBNow सारखे प्लॅटफॉर्म्स या क्षेत्रात आहेत, ज्यामध्ये Blinkit चे सर्वाधिक वर्चस्व आहे.
15 मिनिटांत होईल सामान डिलिव्हर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट मिनिट्सच्या माध्यमातून कंपनीने १५ मिनिटांत सामान डिलिव्हर करण्याचे टार्गेट ठेवले आहे. कंपनी 15 जुलै रोजी ही सर्व्हिस सुरू करू शकते. फ्लिपकार्ट यासाठी आपल्या सप्लाय चेनची मदत घेऊ शकते.
Flipkart minutes मध्ये होऊ शकतो ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसचाही समावेश
फ्लिपकार्ट मिनिट्सच्या माध्यमातून कंपनी केवळ किराणा माल आणि इतर आवश्यक वस्तूंवर लक्ष केंद्रित करणार नाही तर यात ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसचाही समावेश करू शकते. यापूर्वी, कंपनीने फ्लिपकार्ट क्विक नावाने आपली सेवा सुरू केली होती, ज्यामध्ये 90 मिनिटांत डिलिव्हरीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, ही सेवा यशस्वी होऊ शकली नाही.
कोविड नंतर वाढत आहे क्विक कॉमर्स मार्केट
कोविड महामारीनंतर, क्विक कॉमर्स मार्केटमध्ये बरीच वाढ झाली आहे. Blinkit देखील त्याचा प्लॅटफॉर्म विस्तारत आहे. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त रिलायन्स देखील या बाजारात प्रवेश करू शकते. काही काळापूर्वी, रिलायन्स लवकरच आपली क्विक कॉमर्स सेवा सुरू करणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
Flipkart विषयी
Flipkart एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे, तिचे मुख्यालय बंगलोर, कर्नाटक, भारत येथे आहे. तसेच, ती सिंगापूर (फ्लिपकार्ट सिंगापूर) मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून काम करते.फ्लिपकार्टची स्थापना ऑक्टोबर 2007 मध्ये सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी केली होती. कंपनीने सुरुवातीला देशव्यापी शिपिंग मधून ऑनलाइन पुस्तके विकली. 2010 मध्ये, फ्लिपकार्टने Lulu.com कडून बेंगळुरू-आधारित बुक सर्च सर्व्हिस WeRead विकत घेतली. मार्च 2017 पर्यंत, भारताच्या ई-कॉमर्स उद्योगात फ्लिपकार्टचा 39.5% बाजार हिस्सा होता. फ्लिपकार्ट आता इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरातील आवश्यक वस्तू, किराणा माल आणि लाईफस्टाईल प्रॉडक्ट ऑनलाइन देखील ऑफर करते.फेब्रुवारी 2014 नंतर फ्लिपकार्टने मोटो G स्मार्टफोन, Xiaomi Mi 3, Redmi 1S आणि Redmi Note, आणि Micromax चे Yu Yunique 2 यासह इतर स्मार्टफोन भारतीय बाजारात ऑनलाइन लॉन्च केले