अंधत्वामुळे शिवम त्रस्त, तर कुटुंबीनाही करावी लागली रुग्णालयांची वारी
शिवमचे कुटुंबीय सांगतात की त्याच्या एक डोळ्याच्या अंधत्वामुळे त्याला अनेक क्रियाकलाप करताना अडचणी येत होत्या. त्याचा त्रास कायमचा दूर व्हावा म्हणून आम्ही अनेक डॉक्टर आणि रुग्णांलयांशी संपर्क साधला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर आम्ही तिबेटमधील एका लहान रुग्णालयात अधिकचे पैसे खर्चुन चेकअपही केले. त्या रुग्णालयानेही त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. या समस्येमुळे शुभम आपला अभ्यास देखील नेटाने करु शकला नाही. यामुळे आम्ही चिंतीत होतो.
‘आमचे सर्व प्रयत्न फोल गेल्यानंतर अखेर त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी परत येण्याच्या आशा मावळल्या. इतक्यात आमच्याच परिसरात एक डोळ्यांचा खाजगी दवाखाना असल्याचे कानावर पडले जिथे फक्त पाच रुपयांत डोळ्यांचा इलाज केला जातो.’ असे देखील कुटुंबीयांनी सांगितले.
शिवमला उजव्या डोळ्याने अजिबात दिसत नव्हते. लहान मुलांना बेशुद्ध करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे ही वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आहे. आमच्या रुग्णालयातील ही पहिलीच आव्हानात्मक शस्त्रक्रिया आहे. यापुढील काळातही लोकांना चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापन काम करेल.
डॉ. बृजभूषण, रुग्णालयाचे संचालक
पाच रुपयांनी शिवमला जीवदान
गिधौर मार्केटमध्ये असलेल्या या खाजगी दवाखान्यात पाच रुपयांत कोणाच्याही डोळ्यांचा होऊ शकतो, असे कळताच शिवमच्या कुटुंबाने ते रुग्णालय गाठले आणि तिथे शिवमच्या डोळ्यांची तपासणी करुन घेतली. ज्यासाठी त्यांना फक्त पाच रुपये मोजावे लागले. ही नाममात्र रक्कम शिवमसाठी वरदान ठरली आहे. यामुळे शिवमच्या कुटुंबीयांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.