हायलाइट्स:
- समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप
- वानखेडेंनी दाखल केली तक्रार
- गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
मुंबईः एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. वानखेडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकाचींही भेट घेतली होती. या नंतर पुन्हा एकदा आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
समीर वानखेडे यांनी केलेल्या आरोपांमुळं राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा विरोधकांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. या सर्व घडामोडींवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. वळेस- पाटील यांनी वानखेडे यांचे आरोप फेटाळले आहेत.
‘मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कोणालाही दिलेल्या नाहीत. त्यांच्या आरोपांविषयी मला फार काही माहिती नागी. त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन,’ असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
समीर वानखेडे-मोहित कंबोज यांची भेट?; नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट
सुबोध जैस्वाल यांना समन्स बजावले आहे. यावरही दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘सीबीआय डायरेक्टर म्हणून समन्स बजावलेले नाहीत ते साक्षीदार म्हणून समन्स बजावले आहेत. रश्मी शुक्ला प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यावेळी ते डीजी होते,’ असंही वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘आज पोलीस दलाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात वाढणारी गुन्हेगारी किंवा महिलांवरील अत्याचार याविषयी सूचना देण्याच्या दृष्टीने राज्यातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. दुपारी २ ते ५ ही मीटिंग असेल. यात पोलीस दल अधिक प्रभावी कसा करता येईल, यासाठी विचार करण्यात येईल,’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
वाचाः समीर वानखेडे आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी
समीर वानखेडेंचा आरोप काय?
समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली असल्याचा आरोप केला आहे. तसंच, त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले आहेत. ज्या ठिकाणी वानखेडे यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्मशानभूमीत आईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दोन संशयीत व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचे वानखेडेंना लक्षात आले. सोमवारी ११ ऑक्टोबरला आला. त्यानंतर त्यांन आपला पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेजही मिळवले. त्यानंतर या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे.
‘कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे’; आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंचा मोठा आरोप