Suraj Revanna Arrest : ‘लैंगिक’ छळाप्रकरणी एचडी रेवन्ना यांचा दूसरा नातू सूरज रेवन्नाला पोलिसांनी केली अटक

बेंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमध्ये जेडीएस नेता प्रज्वल रेवन्ना अडकलेला आहे. अशातच आता त्याचा भाऊ सूरज रेवन्ना याला देखील पोलिसांनी रविवारी (२३ जून) अटक करण्यात आली असून त्याच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्यासोबत समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप सूरज रेवन्ना याच्यावर करण्यात आला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

चेतन के एस असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. त्याने सुरज रेवन्ना याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या तक्रारीत सांगितले की, १६ जून रोजी जेडीएस एमएलसी सूरज रेवन्ना यांनी त्याला त्याच्या फार्महाऊसवर बोलावले होते. येथे त्याने जबरदस्तीने माझे चुंबन घेतले. पुढे सूरज मला म्हणाला की, तू या फार्महाऊसमध्ये एकटा आहेस. तुला आमच्या कुटुंबाबद्दल माहिती नाही. तू मला सहकार्य कर नाही तर तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. मग त्याने मला त्याच्या खोलीत नेले आणि माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अशी तक्रार तरुणाने केली होती. याच प्रकरणावरून पोलिसांनी सुरज रेवन्ना याला अटक केली करत त्याच्यावर भादंवि कलम ३७७, ३४२, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Naveen-ul-Haq: अफगाणिस्तानने सामना जिंकूनही नवीन-उल-हलक आपल्याच लोकांवर नाराज ?; शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची आता सर्वत्र चर्चा

तक्रारदार तरुणावर सूरज रेवन्ना यांनी केला खंडणीचा आरोप

तर दुसरीकडे, तक्रारदार तरुण चेतनवर सूरज रेवन्ना यांनी खंडणीचा आरोप केला आहे. शुक्रवारी (21 जून) रोजी शिवकुमार यांनी चेतन आणि त्याच्या मेहुण्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यांनी तक्रारीत म्हंटलं आहे की, चेतन पूर्वी त्याचा मित्र होता. पुढे तो सूरज रेवन्ना ब्रिगेडसाठी काम करू लागला. अलीकडेच चेतनने कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पैसे मागितले. मात्र सूरज यांनी नकार दिला यानंतर चेतनने सूरज रेवन्ना विरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. चेतनने ५ कोटींची मागणी केल्याचा दावा शिवकुमारने केला आहे. नंतर त्यांनी मागणी कमी करून दोन कोटी रुपये केले. असल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे.

कर्नाटक सेक्स स्कँडल नेमकं आहे तरी काय ?

सर्वप्रथम प्रज्वल रेवन्ना याच्या घरात काम करणाऱ्या महिलेने त्याच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. त्यानंतर २४ एप्रिल रोजी अनेक पेन ड्राइव्ह सापडले. त्यामध्ये ३ ते ४ हजार व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटक राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली. प्रज्वलवर बलात्कार, विनयभंग, ब्लॅकमेलिंग, धमकी देण्याच्या आरोपांसह तीन एफआयआर दाखल करण्यात आले होते.

Source link

hd revannakarnatak newsSuraj Revanna Arrest Newsएचडी रेवन्नाकर्नाटक न्यूजकर्नाटक सेक्स प्रकरणसूरज रेवन्ना अटक
Comments (0)
Add Comment