पुन्हा हिट अँड रन! धडक देऊन पळत होता कार चालक; रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला चिरडलं

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. आरोपी कार चालकानं सिंचन विभागाच्या कर्मचाऱ्याला चिरडलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात काही जण सफेद रंगाच्या व्हेन्यू कारला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यानंतर चालक कारचा वेग वाढवतो आणि एकाला चिरडतो. कार त्याच्या अंगावर घालतो. त्यानंतर तिथून पळ काढतो.

भोला तिवारी असं मृताचं नाव आहे. ते सिंचन विभागात कार्यरत होते. घटना रविवारी रात्री कानपूरच्या रैना मार्केटमध्ये घडली. एका कारला धडक देऊन पळणाऱ्या हुंडाई व्हेन्यू कारला काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कार थांबवण्याच्या ऐवजी चालकानं वेग वाढवला. कारला रोखण्यासाठी भोला तिवारी पुढे सरसावले. तेव्हा चालकानं त्यांना ४० मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर त्यांच्या अंगावरुन कार नेली. तिथे उपस्थित असलेल्या एकानं घटनेचं चित्रीकरण केलं. ज्या कारनं भोला तिवारींना चिरडण्यात आलं, त्या कारवर उत्तर प्रदेश सरकार असा उल्लेख आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात चौकशी करुन सोडलेला शिक्षक पुन्हा ताब्यात; पोलिसांचं सर्च ऑपरेशन
कानपूरच्या एफ एम कॉलनीत राहणाऱ्या भोला तिवारींना एका कार चालकानं धडक दिली. त्यांना कारखाली चिरडून तो फरार झाल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. पोलिसांनी भोला तिवारींना हॅलट रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कार मालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण तिथे आरोपी सापडला नाही. आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी तिवारींच्या पत्नीनं केली आहे.

Source link

car run overcrime newshit and runkanpur hit and runman killedकानपूर हिट अँड रनकारखाली चिरडलंकारखाली चिरडल्यानं मृत्यू
Comments (0)
Add Comment