ही पॉवर बँक पोर्टेबल लॅपटॉप चार्ज करण्यास सक्षम आहे, परंतु कोणते लॅपटॉप याला सपोर्ट करतील याची माहिती अद्याप कंपनीने स्पष्ट केलेली नाही.
OnePlus Ace 3 Pro फोन
OnePlus Ace 3 Pro हा फोन 6,100mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. रियरला 50 मेगापिक्सलचा Sony LYT-800 मुख्य सेन्सर आणि 8 मेगापिक्सल व 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे असतील.
फोनच्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर 50-मेगापिक्सलचा Sony LYT-800 मुख्य सेन्सर मागील बाजूस आढळू शकतो. फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल्स आणि २ मेगापिक्सल्स असे कॅमेरा सेटअप देण्यात येईल.
OnePlus Pad Pro टॅबलेट
OnePlus Pad Pro हा कंपनीचा पहिला प्रो टॅबलेट असेल. यात Snapdragon 8 Gen 3 चिपसेट असू शकतो. टॅबलेटमध्ये 12.1 इंच LCD डिस्प्ले आणि 3K रिझोल्यूशन मिळू शकते. तसेच यात 144Hz रिफ्रेश रेट आणि 16GB रॅम असेल. टॅबलेटमध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 9,510mAh बॅटरी देण्यात येणार आहे.
27 जून रोजी OnePlus च्या या आगामी ईवेंटमध्ये कंपनीचे नवीन प्रॉडक्ट्स पाहण्यासाठी अनेक तंत्रज्ञानप्रेमी उत्सुक आहेत. या लाँचिंग इव्हेंटमध्ये OnePlus Ace 3 Pro, नवीन पॉवर बँक आणि OnePlus Pad Pro टॅबलेटची अधिकृत माहिती मिळणार आहे.