iQOO 13 स्मार्टफोन लाँच नोव्हेंबर 2024 च्या आसपास पाहायला मिळू शकतो. असा अंदाज लावेल अजात आहे की फोनमध्ये ड्युअल चिप सेटअप दिला जाईल. हा Snapdragon 8 Gen 4 चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. जो लवकरच बाजारात येईल आणि क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली चिपसेट असेल. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एक खास चिपसेट दिला जाऊ शकतो. जेणेकरून या फोनवर गेमिंग एक्सपीरियंस चांगला मिळेल.
प्रसिद्धे टिपस्टर Smart Pikachu नुसार, फोन मॅक्रो लेन्ससह येऊ शकतो. यात 100X हायब्रीड झूम पाहायला मिळू शकतो. फोनच्या कॅमेरा परफॉर्मन्सवर देखील कंपनी काम करत असल्याची माहिती देखील टिपस्टरनं दिली आहे. डिजाइन बाबत सांगण्यात आले आहे की यात रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल मिळेल. हा मागे फोनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असेल. फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो.
iQOO 13 फोनबद्दल याआधी आलेल्या एका रिपोर्टनुसार, फोनमध्ये फ्लॅट OLED पॅनल असू शकतो, जो 2K रिजॉल्यूशनसह येऊ शकतो. यात सिंगल पॉइंट अल्ट्रासॉनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. ज्याचा रिस्पॉन्स खूप फास्ट अशी अपेक्षा आहे. नवीन आयकू फोनमध्ये मोठ्या आकाराची एक्स-अॅक्सिस लीनियर मोटर दिली जाऊ शकते. त्याचबरोबर हा फोन IP68 रेटिंगसह येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा डस्ट आणि वॉटर प्रूफ बनू शकतो.
बाजारात लाँच झाल्यानंतर हा फोन शाओमी 15, वनप्लस 13 आणि विवोच्या आगामी फ्लॅगशिप फोन्सना टक्कर देऊ शकतो. कारण या फोन्समध्ये क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन 8 जेन 4 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. आगामी शक्तिशाली प्रोसेसर सर्वात आधी कोणत्या स्मार्टफोनमध्ये मिळेल ते आता पाहावं लागेल.