Google Pixel 8 फोनवर 15 हजारांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

जर तुम्हाला हटके फीचर असलेला फोन खरेदी करायचा असेल तर Google Pixel सीरीजचे फोन तुम्हाला आवडू शकतात. Google चा लेटेस्ट फ्लॅगशिप फोन, Pixel 8 सीरिजचे फोन Flipkart Mega June Bonanza सेलमध्ये खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. हा फोन फ्लिपकार्टवर 15,000 रुपयांच्याडिस्काउंट सह विकला जात आहे. हा Google Pixel 8 वर मिळणारा सर्वात मोठा डिस्काउंट आहे. चला जाणून घेऊया या फोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती आणि कशाप्रकारे तुम्ही जास्त सूट मिळवू शकता.

Google Pixel 8 वरील डिस्काउंट

गुगलनं गेल्यावर्षीच्या सुरुवातीला गुगल पिक्सल 8 चा 8GB रॅम व 128GB व्हेरिएंट 75,999 रुपयांमध्ये लाँच आला होता. आता बातमी आहे की फ्लिपकार्टवर हा फोन 15,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकला जात आहे. फ्लिपकार्टवर सध्या या फोनचा रोज कलर व्हेरिएंट 60,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

त्याचबरोबर ग्राहक आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 8,000 रुपयांची तात्काळ सूट मिळवू शकतात. त्यामुळे ही डील आणखी चांगली सिद्ध होते. म्हणजे जर तुम्हाला ही ऑफर मिळाली तर तुम्ही 52,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता.

Google Pixel 8चे फीचर्स

गुगल पिक्सल 8 मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले आहे जो 60 हर्ट्झ120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनी स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसचा वापर करत आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सल वाइड कॅमेरा सेन्सर, आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 10.5 मेगापिक्सल Dual PD सेल्फी सेन्सर मिळेल.

या फोनमध्ये 4575 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 30 वॉट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो. फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये टेंसर जी3 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा कंपनीचा प्रोसेसर आहे त्यामुळे त्यावर जास्त नियंत्रण मिळते. आणि एआय फीचर्सचा वापर चांगल्याप्रकारे करता येतो.

Source link

googlegoogle pixel 8pixel 8गुगलगुगल पिक्सल ८गुगल पिक्सल ८ ची किंमत
Comments (0)
Add Comment