पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा नितेशने शेजारी राहणाऱ्या महालक्ष्मी या मावशीला मोबाईलवर मेसेज पाठवला ज्यात लिहले होते की, माझा फोन, घराची किल्ली आणइ एक छोटा टेप असलेला बॅग घरात ठेवला आहे. तातडीने माझ्या घरी जा. नितेशने शुक्रवारी रात्री ९.३०च्या सुमारास मेसेज पाठवला. पण महालश्मी यांनी तो शनिवारी रात्री १२.३०च्या सुमारास पाहिला. मेसेज पाहिल्यानंतर महालक्ष्मी तातीडने पद्मा यांच्या घरी गेल्या तर घराच्या भितीवर आणि फर्शीवर रक्ताचे डाग दिसले. तसेच घरातून उग्र वास येत होता. घरात दोन प्लॉस्टिकच्या बॅगेत बहिण पद्मा आणि संजय यांचे मृतदेह दिसले.
पोलिसांनी नितेशच्या फोनवरून त्याच्या लोकेशनचा शोध घेतला आणि अखेर तिरुवोत्तियुरच्या समुद्र किनाऱ्यावरून त्याला अटक केली. ४५ वर्षीय एम पद्मा या एक्युपंक्चर थेरेपिस्ट होत्या तर १५ वर्षीय संजय हा १०वीत शिकत होता. पद्मा यांचे पती मुरुगन ओमान येथे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करतात. चौकशी दरम्यान, नितेशने सांगितले की, आई फार कडक स्वभावाची होती आणि सेमिस्टर परीक्षेत कमी मार्क कमी पडल्याने त्याला ओरडली होती.
लहान भावाची हत्या का केली?
दोन महिन्यांपूर्वी नितेश घरातून पळून गेला होता. मित्र आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी समजावल्यानंतर तो पुन्हा घरी परतला होता. आपल्या आईशी तो नाराज होता. पण लहान भावाला का मारले यावर त्याने सांगितले की, मला त्याला मारायचे नव्हते, मात्र तो अनाथ झाला असता.
दोघांची हत्या केल्यानंतर निरेश ट्रेनच्या समोर येऊन जीव देणार होता किंवा समुद्रात उडी मारून जीव देणार होता. मात्र या दोन्ही गोष्टी शक्य न झाल्याने अखेर त्याने मावशीला मेसेज केला. कारण दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात हत्येची बातमी आली नव्हती. नितेशला पोलिसांनी अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ओमान येथे काम करणाऱ्या मुरुगन यांना कळवण्यात आले असून ते भारतात परत येत आहेत.