दुरुस्ती करूनही पुन्हा गळती
काही दिवसांपूर्वी मंदिराच्या छतातून पाणी गळत आहे ही गोष्ट लक्षात आली होती. त्यानंतर काम करून गळती थांबवण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसाने पुन्हा एकदा मंदिराच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे पूजाऱ्यांची बसण्याची जागा आणि व्हीआयपी दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची जागा ओली होत आहे. पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात साचल्यामुळे पाणी बाहेर काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
राममंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा
मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्रदास यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले की, ”अयोध्येतील राम मंदिराच्या छतामधून या आधी पाणी गळत होते. त्यानंतर त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु आता पुन्हा एकदा पाणी गळू लागले आहे. राममंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा झाला आहे. सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी गेले असता गर्भगृहात मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आले”.
टाटा कन्सल्टन्सी आणि एलएनटी कंपनीने मिळून केले काम
राम मंदिराच्या उभारणीचे काम टाटा कन्सल्टन्सी आणि एलएनटी कंपनीने केले आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून भव्य मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.या सोहळ्यात हजारो लोक भक्त अयोध्येत दाखल झाले होते.