Russia Dagestan Terror Attack : रशिया हादरलं..! चर्च आणि ज्यू प्रार्थनास्थळावर दहशतवादी हल्ला, तब्बल ‘इतक्या’ लोकांचा झाला मृत्यू

मॉस्को : रशियाच्या दक्षिणी दागेस्तान भागात असणाऱ्या दोन चर्च, एक ज्यू मंदिर आणि एका पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. तसेच 25 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

हल्लेखोरांनी वृद्धाचा गळा कापला

रशियाच्या राष्ट्रीय दहशतवाद विरोधी समितीच्या म्हणण्यानुसार, पहिला हल्ला कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या डर्बेंट शहरात झाला. तर सीएनएनने दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलेव यांनी देखील हल्ल्याबाबतची अधिक माहिती दिली आहे ते म्हणाले की, हल्लेखोरांनी पास्टर निकोले यांचा गळा चिरला. ते वृद्ध 66 वर्षांचे असून खूप आजारी होते. तर दुसरा हल्ला सुमारे ७५ मैल दूर असलेल्या मखचकला या भागात झाला.

गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी शोक व्यक्त केला

दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना दागेस्तान प्रदेशाचे गव्हर्नर सर्गेई मेलिकोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर एक व्हिडिओ करत शोक व्यक्त केला आहे. ते व्हिडिओत म्हणाले की, ”घडलेली घटना अतिशय दुख:द आहे. 24, 25 आणि 26 जून हे शोक दिवस म्हणून घोषित करण्यात आले आहे. सरकारी इमारतींवरील झेंडे अर्ध्यावर फडकवले जातील तसेच सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले जाणार आहेत”.
अमेरिकेत सुपरमार्केटमध्ये गोळीबार, भारतीय तरुणाने गमावला जीव

दागेस्तानने युक्रेन आणि नाटो देशांना दिला दोष

दागेस्तानने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून या हल्ल्यासाठी युक्रेन आणि नाटो सदस्य देशांना जबाबदार धरले आहे. दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी या आरोप केले आहेत ते म्हणाले की, ”आजचा दहशतवादी हल्ला हा रशिया आणि युक्रेन यांच्या संपर्कात असणाऱ्या संघटनांनी केला आहे.” मात्र, या आरोपावर
युक्रेनने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

Source link

dagestan blastrussiarussia newsrussia terror attackदागेस्तान दहशतवादी हल्लारशिया दहशतवादी हल्लारशिया न्यूज
Comments (0)
Add Comment