Android स्मार्टफोनवर कशी बदलायची whats app ची रिंगटोन; आजच जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

WhatsApp हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे, जे जगभरातील लाखो लोक वापरतात. या ॲपचा वापर करून लोक त्यांच्या मित्रांशी चॅट करू शकतात, ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतात आणि ऑडिओ-व्हिडिओ फाइल्स शेअर करू शकतात. यासोबतच या ॲपच्या युजर्सना अशी अनेक फीचर मिळतात जी त्यांच्यासाठी दुर्मिळ आहेत. हे ॲप लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रत्येक देशात त्याचे युजर्स आहेत यावरून त्याची लोकप्रियता मोजली जाऊ शकते. कंपनी वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते.

WhatsApp वरही करू शकता रिंगटोन सेट

स्मार्टफोनप्रमाणेच, तुम्ही WhatsApp वर तुमच्या आवडीची रिंगटोन देखील सेट करू शकता.पण, व्हॉट्सॲपवर रिंगटोन कसा सेट करायचा हे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. जर तुम्हालाही WhatsApp वर रिंगटोन सेट करण्याची प्रोसेस माहित नसेल तर काळजी करू नका. इथे यासंबंधी संपूर्ण माहिती देत आहोत.

WhatsApp वर रिंगटोन सेट करा स्टेप बाय स्टेप

1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
2. नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा.
3. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पॉप अप मेनू उघडेल. येथे तुम्ही Settings वर क्लिक करा.
4. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्ही Notification या ऑप्शनवर क्लिक करा.
5. यानंतर, स्क्रीन खाली स्क्रोल करा आणि कॉल सेक्शनमधील रिंगटोन पर्यायावर क्लिक करा.
6. येथे तुम्हाला अनेक रिंगटोन ऑप्शन्स मिळतील, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही ऐकू शकता.
7. रिंगटोन निवडल्यानंतर, ओके बटणावर क्लिक करा.

रिचार्ज न करताही करता येणार कॉल,व्हॉट्सॲपचे नवीन फीचर

व्हॉट्सॲप वेळोवेळी फीचर्समध्ये बदल करत आहे. आता यात आणखी एक नवीन फीचर मिळणार आहे. त्याला ‘इन-ॲप डायलर’ असे नाव देण्यात आले आहे. नावावरूनच स्पष्ट आहे की, तुम्ही थेट व्हॉट्सॲपवरूनच कॉल करू शकाल. म्हणजेच व्हॉट्सॲपच्या मदतीने तुम्ही थेट मेसेज आणि कॉल्स पाठवू शकाल आणि यासाठी वेगळे काहीही करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये तुम्हाला डायलर देखील मिळणार आहे.

कोणाचाही नंबर डायल करणे सोपे

जगभरातील लोक व्हॉट्सॲप वापरतात, त्यामुळे त्यांना कोणाचाही नंबर डायल करणे सोपे जाईल. कारण सध्या एखाद्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह नसेल आणि तुम्हाला त्याला कॉल करायचा असेल तर ते अवघड होऊन बसते. पण या फीचरनंतर तुम्हाला कॉल करणे खूप सोपे होणार आहे. कारण तुमच्याकडे डायलर पॅड असेल आणि त्याच्या मदतीने तुम्ही थेट कॉल करू शकाल. आता त्याची चाचणीही सुरू झाली आहे. युजर्स ते बीटा व्हर्जनमध्ये देखील वापरत आहेत. इन-ॲप डायलर फीचर हा WhatsApp अपडेटचा एक भाग आहे आणि त्यासंबंधीचा युजर अनुभव खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच त्याची चाचणी सातत्याने केली जात आहे.तुम्ही थेट व्हॉइस कॉल देखील करू शकता. नेटवर्क कॉल्स आणि इंटरनॅशनल कम्युनिकेशनची सुविधाही यामध्ये दिली जाऊ शकते. याचा अर्थ असा की आता तुम्ही कमी किमतीचा प्लान खरेदी करूनही कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला वायफाय कनेक्शन आवश्यक आहे.

Source link

Androidwhats appwhats app ringtoneअँड्रॉइडव्हॉट्सॲपव्हॉट्सॲप रिंगटोन
Comments (0)
Add Comment