dussehra rally: शिवसेनेचा दसरा मेळावा; रामदास कदम यांना बोलावलं असेल का?, रंगली चर्चा

हायलाइट्स:

  • यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद हॉलमध्ये.
  • रामदास कदम यांना दसरा मेळाव्याला बोलावणार की नाही?, राजकीय वर्तुळात चर्चा.
  • कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी रामदास कदम यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा.

मुंबई:शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कात न होता तो षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी ५० टक्के उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेनेचा हा दसरा मेळावा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम. या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार की नाही ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. (whether ramdas kadam will be invited to the dussehra rally of shiv sena after audio clip issue)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले. त्या संदर्भात किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनीच आवश्यक ती माहिती पुरवली असा गंभीर आरोप कदम यांच्यावर करण्यात आला. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा आरोप कदम यांच्यावर केला होता.

क्लिक करा आणि वाचा- ‘कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे’; आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंचा मोठा आरोप

हा आरोप करताना त्यांनी एक ऑडिओ क्लिपही प्रसिद्ध केली. त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचा दावा केला गेला. असे असले तरी हा आपला आवाज नसून हे सर्व आरोप खोटे असल्याचे रामदास कदम यांनी स्पष्टपणे म्हटले होते. इतकेच नाही, तर या आरोपांविरोधा आपण कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत असल्याचेही कदम यांनी सांगितले आहे. अनिल परब आणि आपले अतिशय चांगले संबंध असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘बंद में कभी कभी ऐसा हो जाता है’; संजय राऊत यांची ‘महाराष्ट्र बंद’बाबत प्रतिक्रिया

मात्र, असे असले तरी देखील कथित ऑडिओ क्लिपप्रकरणामुळे रामदास कदम यांच्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे का?, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चाही ऐकू येत आहे. यामुळे रामदास कदम यांना यावेळी दसरा मेळाव्यात बोलावले जाणार की नाही यावर चर्चा ऐकायला मिळत आहे. इतकेच नाही, पक्षीय पातळीवर तर कथित ऑडिओ क्लिपची पडताळणीही केली जाणार असल्याची चर्चा आहे.

क्लिक करा आणि वाचा- प्रवीण दरेकरांचा मलिकांवर हल्लाबोल; जावयाचे ड्रगप्रकरण काढत म्हणाले…

Source link

dussehra rallyRamdas Kadamshiv senaदसरा मेळावारामदास कदमशिवसेनाशिवसेनेचा दसरा मेळावा
Comments (0)
Add Comment