Elon Musk: श्रीमंतांच्या हट्टापायी होऊ शकते पृथ्वीचे नुकसान; इलॉनमुळे पुन्हा ओझोन लेयर धोक्यात

इलॉन मस्कच्या स्टारलिंक सारख्या इंटरनेट सॅटेलाइट नेटवर्कमुळे ओझोनच्या थराचे नुकसान होऊ शकते, असा दावा नवीन संशोधनात करण्यात आला आहे. सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल इंजिनियरिंगच्या शात्रज्ञानांनी धोक्याची सूचना दिली आहे. त्यांच्या मते लो-अर्थ ऑर्बिट इंटरनेटमुळे वातावरणात धोकादायक रासायनिक प्रक्रिया सुरु होऊ शकते.

सध्या लो-अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या नजीकचा अवकाशात 8,000 इंटरनेट सॅटेलाइट आहेत ज्यातील 6,000 सॅटेलाइट स्टारलिंकचे आहेत. या सर्व कृत्रिम उपग्रहांमध्ये मोठ्याप्रमाणात अल्युमिनियम आहे. तसेच यांची वयवमर्यादा देखील पाच वर्षांइतकी कमी आहे. जेव्हा हे सॅटेलाइट पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा समस्या सुरु होते. कारण तेव्हा हे पेट घेतात आणि अल्युमिनियम ऑक्साइड बनवतात. त्यामुळे एक रासयनिक प्रक्रिया सुरु होते जी ओझोनसाठी खूप घातक आहे.

गेल्या आठवड्यात प्रकशित करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे की 2016 ते 2022 या कालावधीत वातवरणात अल्युनियम ऑक्साईड आठ पटीने वाढला आहे. आणि भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण SpaceX येत्या काळात स्टारलिंकचे 42,000 सॅटेलाइट लाँच करण्याची योजना बनवत आहे. तसेच अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्या देखील स्वतःचे आणखी हजार सॅटेलाइट लाँच करू शकते.

त्याहीपेक्षा धोकादायक बाब म्हणजे हे अल्युमिनियम ऑक्साइड कोणत्याही कृतीमुळे संपत नाहीत आणि अनेक दशके वातावरणात तसेच राहू शकतात. 2022 मध्ये 18.7 टन अल्युमिनियम ऑक्साइड नॅनो पार्टीकल वातावरणात सोडले गेले होते. आगामी नियोजित सॅटेलाइट लाँचमुळे दरवर्षी 397 टन पर्यंत वाढू शकतो.

हायस्पीड इंटरनेट देत आहे इलॉन मस्क

छोटे सॅटेलाइट लो-अर्थ ऑर्बिट लाँच केल्यामुळे मोठ्या प्रमाणातील डेटा फास्ट प्रोसेस करता येतो. आधी सॅटेलाइट उंचावर असायचे त्यामुळे इंटरनेट स्पीड कमी मिळतो. परंतु त्यांचे आयुष्य जास्त असतं. इलॉन मस्कनं 2002 मध्ये स्टारलिंकची पॅरेन्ट कंपनी SpaceX सुरु केली होती. जी स्पेस इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी कंपनी आहे.

2019 मध्ये कंपनीनं पहिला प्रायोगिक सॅटेलाइट लाँच केले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या लाँचमुळे सॅटेलाइट नेटवर्कचं एक जाळं तयार झालं. ज्यामुळे 100 पेक्षा जास्त देशांमध्ये फास्ट इंटरनेट पुरवण्यात कंपनीला यश मिळालं आहे. ज्यात युक्रेनसारख्या देशाचा समावेश आहे. जिथे स्टारलिंकमुळे युद्धाच्या काळात देखील इंटरनेट चालत होतं.

पुन्हा ओझोन धोक्यात

1970 च्या दशकात क्लोरोफ्ल्युरो कार्बनचा वापर वाढल्यामुळे ओझोन लेयरमध्ये मोठे छिद्र पडले होते. 1987 मध्ये CFC वर बंदी घाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली आणि 2013 मध्ये एक अंदाज वर्तवण्यात आला की ही हानी काही दशकांमध्ये भरून निघेल. परंतु आता या सॅटेलाइट्समुळे पुन्हा ओझोनच्या थराला मोठा निर्माण झाला आहे.

Source link

elon muskozone layerstarlink satellitesइलॉन मस्कओझोनओझोन लेयरस्टारलिंक
Comments (0)
Add Comment