Budh Uday 2024 : मिथुन राशीत बुध ग्रहाचा उदय ; ‘या’ ५ राशींचे भाग्य उजळणार! भरघोस कमाईचा योग!

Budh Uday 2024 in Mithun Rashi :

नोकरी आणि व्यापार यांचा कारक असलेल्या बुध ग्रहाचा २७ जूनला सकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी मिथुन राशीत उदय होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह सूर्याजवळ असतो, तेव्हा त्याची शक्ती क्षीण होते आणि या ग्रहाचा अस्त होतो. पण जेव्हा एखादा ग्रह सूर्यपासून दूर असतो, तेव्हा या ग्रहाचा उदय होतो. अशात स्वतःच्या राशीत उदय झाल्याने बुध ग्रहाला चांगले बळ मिळेल, याचा फायदा जगाला होईल, शिवाय वृषभ, मिथुन, सिंहसह पाच राशींना होणार आहे. या राशींना नशिबाची साथ मिळेल आणि फार चांगली मिळकत होईल, तसेच या करिअरमध्येही प्रगती होईल. तर जाणून घेऊ बुधाचा स्वतःच्या राशीत उदय झाल्याने कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे.

1. बुध उदयाचा वृषभ राशीवर प्रभाव

बुध ग्रहाचा तुमच्या राशीत दुसऱ्या स्थानी उदय होत आहे. या काळात तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल, तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही भरपूर पैसे कमवाल, तसेच बचत करण्यातही यशस्वी व्हाल. नोकरदार व्यक्तींची करिअरमध्येही चांगली प्रगती होईल आणि वेतनवाढीच्या अनेक संधी मिळतील. तर व्यापारी मजबूत स्थितीत असतील. इतर व्यवसायांत गुंतवणूक करू शकता.

2. बुध उदयाचा मिथुन राशीवर प्रभाव

बुध तुमच्या राशीत लग्न भावात म्हणजे पहिल्या स्थानी उदय होत आहे. या राशीसाठी बुध प्रथम आणि चतुर्थ भावाचा स्वामी आहे. या काळात तुम्हाला सुख आणि समाधान मिळेल. तुम्ही घर किंवा वाहन खरेदीत गुंतवणूक करू शकता. व्यापार आणि नोकरीत लाभाच्या संधी मिळतील. जोडीनेच तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील आणि पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबात काही कलह सुरू असेल तर तो संपून जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत नाते मजबूत होईल.

3. बुध उदयाचा सिंह राशीत प्रभाव

बुध ग्रह तुमच्या राशीत ११व्या भावात विराजमान असेल. बुध सिंह राशीच्या दुसऱ्या आणि ११व्या स्थानाचा स्वामी आहे. या काळात सिंह राशीचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही विविध कामात उत्साहाने सहभाग घ्याल. तुमचा व्यवसाय नफ्यात असेल आणि तुम्ही उद्योजक म्हणून यशस्वी व्हाल. भरपूर पैसे मिळवण्याच्या जोडीनेच तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल आणि अडकलेले पैसेही हाती येतील.

4. बुध उदयाचा तूळ राशीवर प्रभाव

बुध तुमच्या राशीत नवव्या भावात उदय होत आहे. या राशीसाठी बुध नवव्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. या काळात कामाच्या संबंधी तुम्ही स्वतःल भक्कम स्थितीत पाहाल, प्रत्येक प्रकारच्या स्थितीतून मार्ग काढण्यात तुम्ही सक्षम असाल. नोकरदार व्यक्तींना या काळात फक्त कामावर लक्ष केंद्रित करावे, ज्यामुळे तुम्हाला समाधानी वाटेल. वैवाहिक जीवनात काही वाद सुरू असेल तर तो वाद या कालावधित संपून जाईल. तुम्हाला संततीकडून सुखद वार्ता मिळेल.

5. बुध उदयाचा कुंभ राशीवर प्रभाव

बुध तुमच्या राशीत पाचव्या भावात आहे आणि कुंभ राशीच्या पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी बुध आहे. या काळात तुमच्या बुद्धी आणि कौशल्याचा स्तर वाढेल. तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवण्याची संधी मिळेल, शिवाय तुम्ही पैशांची बचतही करू शकाल. ग्रहांच्या शुभ प्रभावाने शेअर बाजारातून तुम्हाला खास लाभ होतील. तुम्ही उत्साही आणि ऊर्जावान असाल, त्यामुळे आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगेल राहील आणि अपूर्ण कामे पूर्ण होतील.

Source link

27 June 2024Budh Uday 2024Budh Uday 2024 RashifalFinancial SituationMercury Rise In Geminiनोकरी मिळणार का?बुध ग्रहाचा मिथुन राशीत उदयव्यापारात नफा होणार का?
Comments (0)
Add Comment