प्रचारात विखेंकडून चॅलेंज; लंकेंचं थेट लोकसभेतून प्रत्युत्तर, इंग्रजीतून खासदारकीची शपथ

नवी दिल्ली: लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरु आहे. नगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या साम्राज्याला हादरा देत लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या निलेश लंकेंनी लोकसभेत इंग्रजीत शपथ घेतली. निवडणूक प्रचारात भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांनी इंग्रजीवरुन लंकेंना डिवचलं होतं. त्यानंतर आता लंकेंनी इंग्रजीत शपथ घेत विखेंना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

नगर दक्षिणमध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना झाला. त्यावेळी प्रचारात विखेंनी लंकेंना इंग्रजीतील भाषण करण्यावरुन लंकेंना थेट आव्हान दिलं होतं. ‘माझ्या समोर उभ्या राहिलेल्या उमेदवारानं मी केलेलं भाषण तोंडपाठ केलं, तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. हवं तर त्यांनी महिन्याभराचा अवधी घ्यावा. रात्रंदिवस पाठांतर करावं,’ असं म्हणत विखेंनी लंकेंना डिवचलं होतं.

विखेंनी दिलेल्या आव्हानाला लंकेंनी प्रचारादरम्यान उत्तर दिलं होतं. ‘प्रतिस्पर्धी उमेदवार स्पर्धा कशाची करताहेत तर इंग्रजी बोलण्याची. प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत इंग्रजीतून बोलणे महत्वाचं नाही. तर शेतकरी, सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणं महत्वाचं असल्याचं म्हणत लंकेंनी विखेंना प्रत्युत्तर दिलं होतं. आता लंकेंनी संसदेत इंग्रजीत शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी म्हटलं. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ही शरद पवार गटाची लोकसभा निवडणुकीतील घोषणा लक्षवेधी ठरली होती.

Source link

bjpncpNilesh Lankesujay vikhe patilडॉ. सुजय विखे पाटीलनिलेश लंकेभाजपराष्ट्रवादी काँग्रेस
Comments (0)
Add Comment