Realme C61: आणखी एक स्वस्त स्‍मार्टफोन! याच आठड्यात येतोय Realme C61; मिळू शकतो 6GB RAM

Realme C61 या आठवड्यात भारतात लाँच होणार आहे, सोमवारी कंपनीनं ही माहिती दिली आहे. गेले अनेक दिवस Realme C61 बाबत माहिती विविध माध्यमातून येत होती. एक दिवसापूर्वी फोनचे संभाव्य स्पेसिफिकेशन आणि किंमत देखील ऑनलाइन समोर आली होती. त्यानंतर रियलमीने अधिकृतपणे Realme C61 च्या लाँचची घोषणा केली. Realme C61 आता कंपनीच्या वेबसाइटवर लिस्‍ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर देखील एक मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे, ज्यामुळे आगामी रियलमी फोनचे काही फीचर्स समोर आले आहेत.

Realme C61 ची लाँच डेट

Realme च्या वेबसाइटनुसार, Realme C61 भारतात 28 जूनला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. हा TUV Rheinland सर्टिफिकेशन आणि इंटीग्रेटेड मेटॅलिक फ्रेमसह सादर केला जाणार आहे. Realme नुसार कंपनीचा आगामी स्मार्टफोन ‘स्टील प्रमाणे मजबूत’ आहे.
Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात

कंपनीनं कन्फर्म केलं आहे की Realme C61 मध्ये IP54 रेटिंग असेल, त्यामुळे हा फोन काही प्रमाणात धूळ आणि पाण्यापासून काही प्रमाणात वाचू शकतो. परंतु फोनच्या किंमतीची जास्त माहिती मिळाली नाही, परंतु हा फोन बजेट सेगमेंटमध्ये येणं अपेक्षित आहे.

Realme C61 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Realme C61 मध्ये 1600×720 पिक्सल रिजोल्यूशन आणि 320 DPI पिक्सल डेन्सिटी असलेला HD+ डिस्प्ले असू शकतो. अलीकडेच काही आलेल्या लीक्‍सनुसार, फोन Google Play कंसोलवर मॉडेल नंबर RMX3939 सह दिसला होता. हा Unisoc Speedtrum T612 4G प्रोसेसरसह येऊ शकतो. असं झाल्यास हा 5जी स्‍मार्टफोन नसेल.

Realme C61 मध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सिस्टम असण्याची शक्यता आहे. कंपनीनं एक लेटेस्‍ट टीजर शेयर केला आहे, ज्यात फोनच्या मागे दोन कॅमेरा दिसत आहेत आणि एक एलईडी फ्लॅश आहे. परंतु फोनची डिजाइन ऑनलाइन समोर आलेले रेंडर थोडे वेगळे वाटतात. Unisoc प्रोसेसर 4GB किंवा 6GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह येऊ शकतो. असा अंदाज लावला जात आहे की हा फोन आउट ऑफ द बॉक्‍स Android 14 वर चालेल.

रिपोर्ट्सनुसार, जागतिक बाजारात Realme C61 ची किंमत 130 युरो (जवळपास 11,600 रुपये) असू शकते. भारतात हा 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो. हा वेगवेगळ्या कलर्समध्ये येऊ शकतो. भारतात कलर व्हेरिएंट- मार्बल ब्लॅक आणि सफारी ग्रीन असू शकतात.

Source link

realmerealme c61realme c61 pricerealme phoneरियलमी फोनरियलमी लाँचरियलमी सी६१
Comments (0)
Add Comment