Video : Asaduddin Owaisi यांचा शपथविधी वादाच्या भोवऱ्यात, शपथ घेताना म्हणाले ‘जय फिलिस्तीन’

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सुरू आहे. यादरम्यान एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांची शपथ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बिस्मिल्ला पठण करून त्यांनी शपथेची सुरूवात केली. अखेरीस जय फिलिस्तीन म्हणन त्यांनी शपथेचा शेवट केला. यावरून काही मिनिटांतच भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेऊन लोकसभेत गदारोळ सुरू केला आहे.

नेमके काय घडले?

अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन आहे. निवडून आलेल्या सदस्यांची यादी सभागृहात पटलावर सादर केल्यानंतर सोमवारपासून नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे सुरू आहे. पीठासीन अधिकारी राधामोहन सिंग यांनी एमआयएमचे पक्षप्रमुख तथा हैद्राबादचे खासदार अससुद्दीन ओवेसी यांचे नाव पुकारले. त्यांनी शपथेच्या सुरुवातीला बिस्मिल्ला पठण करून अखेरीस ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय तेलंगणा’, ‘जय फिलिस्तीन’ म्हणत शेवट केला.

ओवेसी यांच्या शपथेनंतर तेलंगणातील भाजप खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी आणि भाजपच्याच डी के अरूणा यांनी शपथ घेतली. त्यानंतर ओवेसी यांच्या शपथेमधील जय फिलिस्तीन शब्दाला लक्ष्य करणे भाजप खासदारांनी सुरू केले. त्यांच्या जय फिलिस्तीन घोषणेवरून आक्षेप घेऊन भाजप खासादारांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.


पीठासीन अधिकारी राधामोहन सिंग यांनी भाजप खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते वाक्य तपासून गरज असल्यास संसदेच्या पटलावरून काढून टाकण्यात येईल, असे राधामेहन सिंग यांनी गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना आश्वास केले. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी गोंधळातच तेलंगणातील काँग्रेसचे खासदार डॉ. रविमुल्लू यांनी शपथ घेतली.
Asaduddin Owaisi : मराठा-ओबीसी वादात असदुद्दीन ओवैसींची उडी, येत्या संसदसत्रातून ही महत्त्वपूर्ण गोष्ट करण्याची मागणी

दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशनाला अल्पकालीन सुटी लागेल आणि त्यानंतर २२ जुलैपासून अधिवेशन पुन्हा सुरू होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल.

अधिवेशनातील प्रमुख कामकाज

२४ व २५ जून – हंगामी अध्यक्षांसह नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी
२६ जून- लोकसभा अध्यक्षांची निवड
२७ जून- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण
२८ जून- अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा
२ किंवा ३ जुलै- पंतप्रधान आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील

Source link

AIMIM MP Asaduddin Owaisiasaduddin owaisiAsaduddin Owaisi jay palestine chantAsaduddin Owaisi Lok Sabha oathAsaduddin Owaisi oath ControversyAsaduddin Owaisi oath takingWho is Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीअसदुद्दीन ओवेसी शपथअसदुद्दीन ओवेसी शपथ वादअसदुद्दीन ओवैसी
Comments (0)
Add Comment