Redmi Note 13 Pro Scarlet Red Edition: रेडमीनं लाँच केला ‘लाल भडक’ फोन; मिळतोय 200 एमपीचा कॅमेरा

Redmi Note 13 Pro Scarlet Red : शाओमी एकामागून एक प्रोडक्ट भारतात लाँच करत आहे. अलीकडेच कंपनीनं ‘शाओमी 14 सीव्ही’ सादर केला होता आणि आता Redmi Note 13 Pro Scarlet Red लाँच केला आहे. फोन आर्कटिक व्हाइट, कोरल पर्पल आणि मिडनाइट ब्लॅक कलर ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत. नवीन व्हेरिएंटच्या स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे ज्यांना भडक लाल रंग आवडतो त्यांच्यासाठी हा डिवाइस परफेक्ट ठरेल. हा दोन स्‍टोरेज व्हेरिएंटमध्ये आला आहे.

रेडमी नोट 13 प्रो स्कार्लेट रेड एडिशनची किंमत

Redmi Note 13 Pro Scarlet Red Edition ची किंमत 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 24,999 रुपये आहे. याचा 8GB रॅम व 256GB मॉडेल 26,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Lionel Messi: मेस्सीचे फॅन असला तर तुमच्याकडे असालच पाहिजे Redmi चा फोन; इतकी आहे किंमत

Redmi Note 13 Pro Scarlet Red Editionचे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 Pro 5G मध्ये 6.67 इंचाचा CrystalRes AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2712 x 1220 पिक्सल, रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1800nits आहे. हा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 67W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 13 Pro 5G मध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. सिक्योरिटीसाठी हा स्मार्टफोन इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक फीचरसह आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी आणि IR ब्लास्टरचा समावेश आहे.

Redmi Note 13 Pro स्‍मार्टफोन यावर्षीच्या सुरुवातीला जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता, त्यानंतर भारतात हा डिव्हाइस आला होता. नवीन कलर व्हेरिएंट त्या लोकांसाठी चांगला ऑप्‍शन ठरू शकतो, ज्यांना लाल रंग आवडतो.

Source link

note 13 pro scarlet red editionRedmiredmi note 13 pro scarlet red editionरेडमी नोट फोनरेडमी नोट १३रेडमी फोन
Comments (0)
Add Comment