Rahul Gandhi Oath: जय हिंद, जय संविधान… राहुल गांधी शपथ घेण्यासाठी पोहोचले तेव्हा सभागृहाचा नजाराच बदलला!

Rahul Gandhi oath as MP, नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेतली. शपथविधीसाठी त्यांचे नाव पुकारताच बहुतांश विरोधी सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. केवळ काँग्रेसच नाही तर इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही उभे राहून त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी शपथ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा त्यांच्या हातात संविधानाची प्रत होती. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी संविधानाची प्रत हातात धरून सत्ताधारी पक्षाकडे दाखवली. यानंतर त्यांनी शपथ घेण्यास सुरुवात केली.शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनी जय हिंद, जय संविधानाचा नारा दिला. शपथ घेतल्यानंतर ते खाली उतरू लागले पण पुन्हा ते सभापतींना भेटायला गेले. यावेळी काँग्रेस सदस्यांनी आपापल्या जागी उभे राहून ‘जोडो जोडो, भारत जोडो’च्या घोषणा दिल्या. यावेळी राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन जागांवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती, मात्र त्यांनी वायनाडमधून राजीनामा दिला होता. आता ते रायबरेलीचे खासदार आहेत.
Mamata Banerjee : लोकसभा अध्यक्ष निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीत फूट, के. सुरेश यांच्या नामांकनावर टीएमसीची नाही सही

राहुल गांधी यांच्यानंतर अमेठीचे खासदार किशोरी लाल शर्मा यांचे नाव शपथविधीसाठी बोलावण्यात आले. किशोरीलाल शपथ घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात संविधानाची प्रतही होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत अमेठीच्या जागेची जोरदार चर्चा झाली. या निवडणुकीत किशोरी लाल यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.

Video : Asaduddin Owaisi यांचा शपथविधी वादाच्या भोवऱ्यात, शपथ घेताना म्हणाले ‘जय फिलिस्तीन’
राहुल गांधींशिवाय आज यूपीचे सपा खासदार डिंपल यादव, मुझफ्फरनगरचे खासदार महेंद्र मलिक, कैरानाचे खासदार इकरा चौधरी, फिरोजाबादचे लोकसभा सदस्य अक्षय यादव, बदाऊनचे खासदार आदित्य यादव आणि इतर अनेक सपा खासदारांनी शपथ घेतली. उत्तर प्रदेशातील नगीना येथून निवडून आलेले आझाद समाज पक्षाचे (कांशीराम) नेते चंद्रशेखर यांनीही लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
तीनदा संवाद झाला, पण कॉल बॅक नाही; लोकसभा अध्यक्षपदासाठी ७२ वर्षांनंतर निवडणूक लागली
यापूर्वी महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी शपथ घेतली. त्यातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ घेतली तर हिंदी, इंग्रजीत शपथ घेणारे १२ खासदार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नुकतेच हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेतल्यानंतर जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टिन अशा घोषणा दिल्या. त्यानंतर काहीशी गोंधळाची परिस्थिती संसदेत झाली होती.

Source link

parliament sessionRahul Gandhirahul gandhi copy of constitutionrahul gandhi lok sabharahul gandhi takes oathजय संविधानभारत जोडोरायबरेली खासदार राहुल गांधीराहुल गांधीराहुल गांधी शपथलोकसभासंसद सत्र
Comments (0)
Add Comment