Rahul Gandhi Leader of Opposition:इंडिया आघाडीचे लोकसभेतील नेते राहुल गांधी, विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती; मोदी ३.० शी करणार दोनहात

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधीपक्ष नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली. ४ जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आता आज मंगळवारी राहुल गांधी यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

विरोधीपक्ष नेतेपदी कोणाची नियुक्ती करावी याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

राहुल गांधी यांची विरोधीपक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रोमेट स्पीकर यांना पत्रद्वारे कळवण्यात आले आहे. याआधी सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधीपक्ष नेते करण्याची मागणी करण्यात आली होती. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी तसा प्रस्ताव देखील मंजूर केला होता. दरम्यान लोकसभेतील विरोधीपक्ष नेतेपदाबाबत विचार करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हवा असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात दौरा केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या जागा आणि मिळालेल्या मतांची टक्केवारी देखील वाढली होती. काँग्रेसच्या या यशाचे मोठे श्रेय राहुल गांधींना देण्यात आले होते.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात विजयी झालेले उमेदवार खासदारकीची शपथ घेत आहेत. आज मंगळवारी राहुल गांधी यांनी शपथ घेतली. शपथ घेताना त्यांच्या हातात संविधानाची पत्र होती. शपथ पूर्ण होताच त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या मार्शलशी देखील हस्तांदोलन केले होते.

Source link

congress general secretary kc venugopalcongress mp rahul gandhilok sabhaRahul Gandhirahul gandhi appointed lopRahul Gandhi Leader of Oppositionराहुल गांधीराहुल गांधी विरोधीपक्ष नेतेपदी
Comments (0)
Add Comment