Arvind Kejriwal Arrested: अरविंद केजरीवाल गोत्यात! सीबीआयकडून तिहार तुरुंगातून अटक

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अबकारी धोरण प्रकरणात अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (२६ जून) न्यायालयात हजर केले जाणार आहे. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याआधी सीबीआयने त्यांना अटक केली आहे.
Mumbai News: फक्त घोषणा करायच्या, द्यायचे तर काहीच नाही, जयंत पाटील सरकारवर संतापले!
सोमवारी सीबीआयने तिहार तुरुंगात बंद केजरीवाल यांचीही चौकशी केली. अबकारी धोरण प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवले. सीबीआय मंगळवारी केजरीवाल यांना ट्रायल कोर्टात हजर करणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याच्या एक दिवस आधी ही बाब समोर आली आहे.तर दुसरीकडे आपचे खासदार संजय सिंह यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. केजरीवाल यांना सीबीआयने खोट्या प्रकरणात अटक करण्यासाठी भाजपचे केंद्र सरकार केजरीवाल यांच्याविरोधात कट रचत असल्याचे ते म्हणाले. यामध्ये सीबीआयचे अधिकारीही त्याला साथ देत आहेत. केजरीवाल यांना जामीन मिळू नये यासाठी भाजप सरकारने सीबीआयसोबत षडयंत्र रचल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.

याआधी दिल्ली हायकोर्टाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. हा आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात असा कोणताही निष्कर्ष द्यायला नको होता. कागदपत्रे आणि युक्तिवाद यांना योग्य दाद दिली गेली नाही.

Source link

Arvind Kejriwal arrestedarvind kejriwal arrested by cbiarvind kejriwal casearvind kejriwal newsexcise policy caseअबकारी धोरण प्रकरणअरविंद केजरीवाल अटकअरविंद केजरीवाल बातमीअरविंद केजरीवालांना सीबीआयकडून अटक
Comments (0)
Add Comment