Parliament Session : जय पॅलेस्टाइननंतर..’जय हिंदूराष्ट्र..’भाजप खासदाराने शपथेनंतर दिलेल्या घोषणेनं नवा वाद

नवी दिल्ली : लोकसभा खासदारांचा शपथविधी संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये पार पडत आहे. २४ जून पासून ते ३ जुलैपर्यंत विशेष सत्र चालणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीचा आजचा दुसरा दिवस आहे. यात भाजपच्या एका खासदाराने शपथेवेळी ‘जय हिंदूराष्ट्र’ या घोषणेचा उच्चार करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी आपल्या शपथविधीवेळी दिलेल्या ‘जय पॅलेस्टाइन’ या घोषणेनंतर आता भाजप खासदारानेही वादग्रस्त घोषणा दिली आहे.

भाजपचे मध्यप्रदेशातील बरेली मतदारसंघातून विजयी झालेले खासदार छत्रपाल सिंग गंगवार यांनी मंगळवारी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्या आधी AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपली शपथ झालेनंतर ‘जय पॅलेस्टाईन’ या घोषणेचा उच्चार केला. यानंतर भाजपच्या अनेक सदस्यांनी ओवेसींच्या पॅलेस्टाइनच्या घोषणेला विरोध केला. यावेळी काही काळ सभागृहात गोंधळ पहायला मिळाला. यानंतर भाजपचे खासदार छत्रपाल सिंग गंगवार शपथ घेण्यासाठी अध्यक्षांच्या आसनाजवळ दाखल झाले. आपली शपथ पूर्ण करत त्यानी अखेरीस ‘जय हिंदूराष्ट्र..जय भारत’ म्हणत आपल्या शपथेचा शेवट केला. यावेळी विरोधकांनी या घोषणेला जोरदार विरोध केला.
Rahul Gandhi Oath: जय हिंद, जय संविधान… राहुल गांधी शपथ घेण्यासाठी पोहोचले तेव्हा सभागृहाचा नजाराच बदलला!

विरोधकांचा आक्षेप

भाजप खासदारांच्या या घोषणेनंतर विरोधी नेत्यांनी या घोषणेला आक्षेप घेतला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घोषणेला विरोध केला. ते म्हणाले की, ‘ही घोषणा संविधानाच्या मूल्यांच्या विरोधी आहे.’ मंगळवारी झालेल्या शपथविधींमध्ये ही दुसरी वादग्रस्त घटना होती.

ओवेसींचा शपथविधी वादाच्या भोवऱ्यात

हैदराबादमधून भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा जोरदार पराभव करुन तिसऱ्यांदा खासदार झालेले असदुद्दीन ओवेसी यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या शपथविधीचा समारोप ‘ जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय पॅलेस्टाईन’ या घोषणेने केला. यावेळी भाजप खासदारांनी त्यातील पॅलेस्टाइनच्या घोषणेला तीव्र विरोध दर्शवला. नंतर आपल्या घोषणेचे समर्थन करताना ओवेसी म्हणाले की, प्रत्येकजण खूपकाही म्हणत होते.त्याप्रमाणे मी ही ‘ जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय पॅलेस्टाईन’ म्हणालो. यात गैर काय आहे. यावेळी ते असेही म्हणाले की संविधानाच्या कोणत्या तरतुदी नुसार हे चूकीचे आहे ते सांगा. त्यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ महात्मा गांधींचा संदर्भ दिला. महात्मा गांधींची पॅलेस्टाइन बद्दलची भूमिका काय आहे हे पाहण्याचा सल्ला विरोधकांना दिला. तसेच पॅलेस्टाइनच्या समर्थनात भूमिका का घेतली असे विचारले असता ते म्हणाले की ‘ते शोषित लोक आहेत.’

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ओवेसींच्या या घोषणेला सभागृहाच्या नियमाविरुध्द असल्याचे सांगितले. ओवेसी भारतात राहून भारत माता की जय म्हणत नाहीत पण पॅलेस्टाइन की जय म्हणत आहेत. त्याची ही कृती देशविघातक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही ओवेसींच्या शपथेवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, ‘भारताचे पॅलेस्टाइन सोबत कोणतेही शत्रुत्व नाही परंतु एका खासदाराने आपला शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या देशाच्या नावाची स्तुती करणे योग्य आहे का हे तपासावे लागेल.’

Source link

asaduddin owaisi palestine sloganbjp mp hindu rashtra sloganjai hindu rashtra slogan while oath takingjai palestine slogan while oath takingparliament sessionएआयएमआयएम असदुद्दीन ओवेसीओवेसी जय पॅलेस्टाइन घोषणाभारतीय जनता पक्षशपथेवेळी जय हिंदूराष्ट्र घोषणासंसद सदस्यांचा शपथविधी
Comments (0)
Add Comment