तीनदा संवाद झाला, पण कॉल बॅक नाही; लोकसभा अध्यक्षपदासाठी ७२ वर्षांनंतर निवडणूक लागली

नवी दिल्ली: अठराव्या लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सुरु असताना लोकसभा अध्यक्षपदावरुन राजकारण तापलं आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे.

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडे लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. उपाध्यक्षपद न मिळाल्यास लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवू अशी ठाम भूमिका इंडिया आघाडीनं घेतली होती. लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सहमती झाल्याचं वृत्त सुरुवातीला आलं होतं. त्यामुळे ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान होतील अशी अटकळ बांधली गेली. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या विधानानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली.
प्रचारात विखेंकडून चॅलेंज; लंकेंचं थेट लोकसभेतून प्रत्युत्तर, इंग्रजीतून खासदारकीची शपथ
‘विरोधकांना राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा आणि सहमती दर्शवावी असं आवाहन त्यांनी केलं. आम्ही त्यांना लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. पण आम्हाला उपाध्यक्षपद हवं असल्याचं सांगितलं. राजनाथ यांनी मल्लिकार्जुन खरगेंना कॉल बॅक करतो म्हटलं. पण तो कॉल अद्याप आलाच नाही. मोदी सांगतात एक अन् करतात दुसरंच. आम्हाला उपाध्यक्षपद मिळणार असेल तरच आम्ही अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊ,’ अशी भूमिका मांडत गांधींनी घटनाक्रम सांगितला.
मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार; १० वर्षे साथ देणाऱ्या पक्षाचा आक्रमक पवित्रा, आघाडी उघडली
राहुल यांच्या विधानानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये नसलेलं एकमत स्पष्टपणे दिसून आलं. या दरम्यान ओम बिर्ला आणि के. सुकेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याआधी एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदाबद्दल एकमत करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विविध नेत्यांशी फोनवरुन बातचीत केली. पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळत नसल्यानं त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Source link

k sureshlok sabha speaker postMallikarjun Khargeom birlaRajnath Singhओम बिर्लाके सुरेशमल्लिकार्जुन खरगेराजनाथ सिंहलोकसभा अध्यक्षपद
Comments (0)
Add Comment