मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीबाबतचे नियम बदलणार आहेत. आता सिम चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला 7 दिवस नवीन सिम मिळणार नाही. तथापि, यापूर्वी असा कोणताही नियम नव्हता आणि तुम्ही लगेचच तोच क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर खरेदी करत होतात. पण आता हे बदलणार आहे.
लॉकिंग कालावधी वाढवला
सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास, तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. यापूर्वी सिमकार्ड चोरीला गेल्यावर किंवा खराब झाल्यानंतर तुम्हाला दुकानातून लगेच सिमकार्ड मिळायचे. मात्र आता त्याचा लॉकिंग कालावधी वाढवण्यात आला आहे. आता युजर्सना 7 दिवस वाट पाहावी लागेल, त्यानंतरच नवीन सिम कार्ड मिळेल. म्हणजेच MNP नियमात बदल केल्यानंतर लागू करण्यात आलेल्या पुढील सात दिवसांनंतरच तुम्हाला हे सिमकार्ड मिळेल.
का घेतला गेला निर्णय
वास्तविक हा निर्णय ट्रायने घेतला आहे. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये एकदा सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तो क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर ॲक्टिव्हेट केल्याचे समोर आले आहे. यानंतर आणखी काही घटना घडवून आणल्या जातात. आता ऑनलाइन घोटाळ्यासारख्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना ट्रायने मार्चमध्ये जारी केली होती.
सिम स्वॅपिंग
सिम स्वॅपिंग म्हणजे तोच नंबर दुसऱ्या सिम कार्डवर ॲक्टिव्ह करणे. आता तोच क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर घेतल्यावर अशा घटना झपाट्याने वाढत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी सिम स्वॅपिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
एकापेक्षा जास्त सिम असणा-यांना TRAI चा दिलासा
सुरक्षेशी संबंधित नवनवीन नियम आणत असतांनाच (Trai) ने नुकतेच स्पष्ट केले आहे की, एक किंवा अधिक सिमसाठी मोबाइल युजर्सना चार्ज करण्यात येणार नाही. सध्या डिऍक्टिव्हेट सिमचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत, TRAI या डिऍक्टिव्हेट सिमला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या योजनेवर काम करत आहे.
नवीन नंबर सीरीज प्रस्ताव
2024 पर्यंत भारतात 1.19 अब्ज पेक्षा जास्त दूरसंचार कनेक्शन असतील. तसेच मोबाईल नंबरची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच ट्रायने एक नवीन नंबर सीरीज प्रस्तावित केली आहे, ज्यामुळे मोबाइल क्रमांक सिस्टिममध्ये सुधारणा करता येईल.
अनेक सिमकार्ड आहेत डिऍक्टिव्हेट
ट्राय न वापरलेले सिम वापरण्याच्या योजनेवरही काम करत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन किंवा अधिक सिम जारी केले असतील आणि ते सिम दीर्घकाळ वापरत नसाल, तर अशा सिमला काळ्या यादीत टाकण्याची तयारी आहे, जेणेकरून तो सिम क्रमांक दुसऱ्याला दिला जाऊ शकतो.