UGREEN 200W ची किंमत
पावर बँकेच्या क्षमतेनुसार ही किंमत परवडणारी वाटते. UGREEN 200W ची किंमत 349 युआन (जवळपास 4,010 रुपये) ठेवण्यात आली आहे. हिचे स्पेसिफिकेशन्स देखील जबरदस्त आहे.
UGREEN 200W चे स्पेसिफिकेशन्स
UGREEN 200W मध्ये दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहेत आणखी एक यूएसबी-ए पोर्ट आहे. ज्याच्या मदतीनं एकाच वेळी 3 डिवाइस चार्ज केले जाऊ शकतात. असा दावा करण्यात आला आहे की दोन्ही टाइप-सी पोर्ट मिळून 200वॉटचा आउटपुट देतात जे एकाच वेळी 2 लॅपटॉप देखील चार्ज करण्यासाठी खूप आहेत.
UGREEN 200W पावरबँक मध्ये 1.54 इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात चार्जिंगची माहिती, वोल्टेज आणि करंटची इन्फर्मेशन मिळते. दावा करण्यात आला आहे की यातील बॅटरी इतकी दमदार आहे की 1 हजार चार्जिंग सायकल नंतर देखील हिची 80 टक्के क्षमता कायम राहते. तसेच ही पावर बँक घेऊन विमान प्रवास देखील करता येतो.
UGREEN 200W सह कंपनी 240W चा ड्युअल हेड टाइप-सी डेटा केबल देत आहे, जी PD3.1 प्रोटोकॉलला सपोर्ट करते. कंपनीनुसार, पावरबँक 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते त्यामुळे फक्त 2 तासांत फुल चार्ज होते. म्हणजे घरातून निघण्याआधी तुमची पावर बँक प्रवासासाठी रेडी असेल.