पुन्हा खासदार निलबंनाची कारवाई नको! विरोधकांनी ओम बिर्लांकडे थेट व्यक्त केली नाराजी

Om Birla Elected As Lok Sabha Speaker : अठाराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदावरुन एनडीए आणि इंडिया आघाडीत बरीच चुरस पाहायला मिळाली. अखेर ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पीएम मोदी आणि राहुल गांधी यांनी बिर्ला यांना अध्यक्षपदांच्या आसनावर बसवले तसेच सभागृहातील सदस्यांनी ओम बिर्लांना पुढील पाच वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. पण विरोधकांनी आभार मानताना मागील पाच वर्षाचा कटू अनुभव सांगत थेट अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त करताना दिसले

विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना म्हणाले, “आम्हाला माहितेय सरकार सत्तेत आहे त्यांना जास्त अधिकार आहेत पण विरोधकांना सुद्धा तितकाच अधिकार आहे, विरोधकांचा आवाज संसदेत दाबला जावू नये, आम्हाला आशा आहे तुम्ही भारतीयांचा आवाज संसदेत दाबणार नाहीत, या संसदेत भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील आवाज पोहचेल. विरोधकांचा आवाज दाबणे ही लोकशाहीच्या विरोधातील कृत्य आहे, त्यामुळे आम्हाला भारताचा आवाज संसदेत पोहचवण्याची संधी द्या” असे गांधी म्हणाले.
ओम बिर्ला भाजपचा आदेश मानणारे, खासदार निलंबित केले, पुन्हा त्यांना संधी का? राऊतांचा सवाल

सपा नेते अखिलेश यादव शुभेच्छा देताना म्हणाले “आम्ही आशा करतो की तुम्ही सर्वांना समान न्याय द्याल, आणि खासदार निलबंनासारखी कारवाई पुन्हा संसदेत होणार नाही ज्याने संसदेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचेल, तुमचा जितका अकुंश विरोधकांवर असतो तितकाच सत्ताधाऱ्यांवर सुद्धा असेल अशी अपेक्षा करतो, तुमच्या आदेशाने लोकसभा चालली पाहिजे याचे उलटे होवू नये अशी आम्ही आशा बाळगतो”.

एआईटीसीचे नेते सुदीप बंद्योपाध्याय बंगालचे प्रतिनिधत्व करतात ते म्हणाले
, “ओम बिर्लाजी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो पण आम्ही पाहिले की तुमचा न्याय सत्ताधाऱ्यांचा बाजूने झुकलेला असतो, एकाच दिवशी शंभरहून अधिक खासदारांचे निलंबन करण्यात येते, सत्ताधाऱ्यांकडून विधेयक मांडली जातात ती कोणत्याही चर्चेशिवाय पास केली जातात अगदी चुकीचे आहे, विरोधक आता मोठ्या संख्येने सभागृहात आहेत त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबणे आता होणार नाही अशी आम्ही आशा करतो”.
Lok Sabha Speaker Election: लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला; मोदी-राहुल यांचं हस्तांदोलन, बिर्लांचं अभिनंदन

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत म्हणाले, “आम्हाला देशासाठी शांतता हवी द्वेष नको, लोकसभेत शेतकरी, तरुणाची बेरोजगारी यावर चर्चा व्हायला हवी, मणिपूर सारख्या घटनेचा संसदेत चर्चा होत नाही यासारखे दुर्देव नाही, म्हणून मी आशा करतो की आता आम्हाला न्याय मिळेल लोकांचे प्रश्न संसदेत सुटतील” असे म्हणत सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.


सुप्रिया सुळे शुभेच्छा देताना म्हणाल्या, “
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्लांजी तुम्हाला खूप शुभेच्छा मी आशा करते मागील वेळी सारखे या वेळी खासदारांवर निलबंनाची कारवाई तुम्ही करणार नाही, प्रत्येकजण इथे लोकाचे प्रतिनिधित्व करतो तर तुम्ही त्याला बोलण्याची संधी द्या, लोकसभा चालवणे सत्ताधाऱ्यांचे काम आहे त्यांनी ते करावे, विरोधकांचा आवाज ऐकून घ्यावा, आपण कोणत्याही पक्षात असलो तरी आपला उद्देश लोकसेवा आहे त्यामुळे पुन्हा अशी निलबंनाची कारवाई होवू नये असे सुप्रिया सुळेंनी मत मांडले.”

Source link

akhilesh yadavarvind sawantom birlaRahul GandhiSupriya Suleअरविंद सावंत संसद भाषणलोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाविरोधीपक्ष नेते राहुल गांधीसुप्रिया सुळे संसद भाषण
Comments (0)
Add Comment