ठरलं तर! या तारखेला भारतात लाँच होईल Moto Razr 50, कॅमेरा, प्रोसेसर, डिस्प्ले मिळेल दमदार

लेनोवोच्या मालकीच्या वाले ब्रँड मोटोरोलानं काल चीनमध्ये Moto Razr 50 आणि Razr 50 Ultra हे दोन फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. आता ब्रँड रेजर 50 मॉडेल चीनच्या बाहेर देखील सादर करण्याची तयारी करत आहे. मोटोरोला भारतात आपला लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीनं आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.

मोटोरोलानं स्पष्ट केलं आहे की ते 4 जुलैला भारतात आपला सर्वात महागडा मोटो रेजर 50 अल्ट्रा स्मार्टफोन लाँच करेल. कंपनीनं हे देखील स्पष्ट केलं आहे की स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर ऑनलाइन उपलब्ध होईल. वर सांगण्यात आलं आहे, मोटोरोलानं आधीच चीनमध्ये मोटो रेजर 50 अल्ट्रा लाँच केला आहे आणि आशा आहे की ते भारतात देखील हाच व्हेरिएंट घेऊन येतील.

हा तीन पॅनटोन-क्यूरेटेड शेड्समध्ये उपलब्ध होईल, जसे की स्प्रिंग ग्रीन, पीच फज आणि मिडनाइट ब्लू. लँडिंग पेजवरून फोनच्या फीचर्सची देखील माहिती मिळाली आहे. भारतात येणारा रेजर 50 अल्ट्रा अगदी तसाच डिवाइस असेल जो सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे.
Moto S50 Neo: 1 नव्हे 4 वर्षांच्या वॉरंटीसह आला स्वस्त मोबाइल; 12GB रॅमसह मिळतो 50MP कॅमेरा

Motorola Razr 50 Ultra ची भारतीय किंमत

मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा भारतात 107,310 रुपयांमध्ये विकला जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु कंपनीनं अद्याप किंमतीची माहिती दिली नाही. फोनची खरी किंमत लाँचनंतरच समोर येईल.

मोटोरोला रेजर 50 चा 8GB/256GB व्हेरिएंट 3,699 युआन (जवळपास 42,500 रुपये) आणि 12GB/512GB व्हेरिएंट 3,999 युआन (जवळपास 46,000 रुपये) मध्ये विकला जाईल.

मोटोरोला रेजर 50 अल्ट्राच्या 12GB + 256GB मॉडेलची किंमत 5,699 युआन (जवळपास 65,500 रुपये) आणि 12GB + 512GB मॉडेलची किंमत 6199 युआन (जवळपास 72,200 रुपये) आहे.

Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन

मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा मध्ये 1080 X 2640 पिक्सल रिजॉल्यूशन, 3000nits पीक ब्राइटनेससह 6.9-इंचाचा फोल्डेबल FHD+ pOLED डिस्प्ले आहे. यात 1272×1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 4 इंचाची pOLED कव्हर स्क्रीन आहे.

हँडसेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन चिपसेट आहे. फोन अँड्रॉइड 14-आधारित मोटो MyUX कस्टम स्किनवर चालतो. फोल्डेबलमध्ये 45W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 4000mAh ची बॅटरी आहे.

मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमला सपोर्टसह 50MP टेलीफोटो शूटर आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी फ्रंटला 32MP चा शूटर मिळतो. डिवाइस IPX8 वॉटर-रेसिस्टेंट रेटिंग मिळते.

Motorola Razr 50 स्पेसिफिकेशन

मोटोरोला रेजर 50 मध्ये हा 6.9-इंचाचा फोल्डेबल FHD+ pOLED डिस्प्ले आहे ज्यात 1080 X 2640 पिक्सल रेजोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300nits पीक ब्राइटनेस आहे. फोनमध्ये 3.6-इंचाची छोटी कव्हर स्क्रीन मिळते. रेजर 50 मध्ये रेजर 50 अल्ट्रा पेक्षा चिपसेट वेगळा आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी डायमेंशन 7300X चिपसेट आहे .हा 8GB/12GB रॅम आणि 256GB/512GB स्टोरेज मॉडेलसह आला आहे.

फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग आणि 15W वायर्ड चार्जिंगसह 4,200mAh ची बॅटरी मिळते. मोटोरोला रेजर 50 मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी आम्हाला फ्रंटला 32MP चा शूटर मिळतो. फोल्डेबल स्टीरियो स्पिकर, डॉल्बी एटमॉस, एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि IPX8 वॉटर-रेजिस्टंट रेटिंगसह आहे.

Source link

motorola razr 50 ultramotorola razr 50 ultra indiamotorola razr 50 ultra launch datemotorola razr 50 ultra pricemotorola razr 50 ultra price in indiaमोटो रेजर ५०मोटोरोलामोटोरोला रेजर ५०मोटोरोला रेजर ५० अल्ट्रा
Comments (0)
Add Comment