अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात! सीबीआयकडून सीएम केजरीवालांना अटक

Arvind Kejriwal : दिल्ली कथित दारु घोटाळा प्रकरण सीबीआयकडून अरविंद केजरीवालांना अटक केली आहे. दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात सीबीआयने अनेक गंभीर दावे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात केले आहेत. सीबीआयने कोर्टात सांगितले १६ मार्च २०२१ साली एका दारु उद्योजकांनी सीएम केजरीवाल यांची भेट घेतली होती, १६ मार्चला दिल्लीच्या सचिवलयात मगुंटा रेड्डी आणि केजरीवालांची पहिल्यांदा भेट झाली होती, रेड्डी दक्षिणेतील खासदार आहेत आणि त्यांनी दारुच्या अबकारी धोरणावर सीएम केजरीवाल यांची मदत मागितली होती. यावर केजरीवालांनी मदत करण्याचे आश्वासन दिले पण आम आदमी पक्षांसाठी निधीची मागणी केली होती.
Arvind Kejriwal : ..जणू अरविंद केजरीवाल फरार दहशतवादी, ईडीच्या याचिकेवर पत्नी सुनिता यांचा हल्लाबोल

मगुंटा रेड्डी यांच्यासोबत कविता रेड्डी यांना संपर्क करायला सांगितला होता असा सीबाआयने दावा केलाय. कविता रेड्डींनी मुंगटा यांची हैदराबादला भेट घेतली आणि पन्नास करोड रुपयांची मागणी केला तसेच हा सगळा प्रकार सीएम केजरीवालांच्या निर्देशानुसार होत होता असा दावा सीबीआय ने केला आहे. विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या परवानगीनंतर सीबीआयने केजरीवालांना अटक केली आहे. सीबीआयचे म्हणे आहे केजरीवाल त्या कॅबिनटचे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी दारुच्या धोरणाला मंजूरी दिले.


तर अरविद केजरीवाल यांच्या वकिलांना सीबीआयच्या अटकेविरोधात विरोध दर्शवला आहे. केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले केजरीवाल सध्या इडीच्या न्यायालयीन कोठडीत असताना सीबीआयने अटक केलीय, कोणता असा आदेश जर जारी झालाय तर आम्हाला तशी कोणतीच माहिती दिली गेली नाही. संविधानाच्या अनुच्छेद २१ चे उल्लघंन करण्यात आले, सीबीआयकडे मागणी आहे की त्यांनी अटक वॉरंटची कॉपी आम्हाला द्यावी असे चौधरी म्हणालेत.

Source link

after ed cbi arrest kejriwalarvind kejriwal get arrestedcbi arrested arvind kejriwalअरविंद केजरीवालअरविंद केजरीवाल अटकअरविंद केजरीवाल बातमीइडीसीबीआय
Comments (0)
Add Comment