यंदा आयफोनच्या आधीच येणार Google Pixel 9 सीरीज; कंपनीनं केली घोषणा

Google Pixel 9 सीरीज यंदा वेळेआधीच लाँच होऊ शकते. कंपनी दरवर्षी आपला लाँच इव्हेंट ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित करते, परंतु यावेळी गुगलचा लाँच इव्हेंट खूप आधी आयोजित केला जात आहे. Google नं घोषणा केली आहे की Made by Google इव्हेंट कॅलिफोर्नियामध्ये ऑगस्टमध्ये आयोजित केला जाईल. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले अनेक पिक्सल डिवाइस सादर करेल.

गुगलचा Made by Google इव्हेंट 13 ऑगस्टला होईल. इव्हेंटमध्ये कंपनी पिक्सल डिवाइस लाँच करेल ज्यात Pixel 9 सीरीज, Pixel Watch 3 XL, आणि गुगलची नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 15 देखील लाँच केली जाऊ शकते. गुगलनं लाँच इव्हेंट वेळेआधीच घोषित करून टेक विश्वाला धक्का दिला आहे. कंपनीनं या घाई मागील कारण मात्र सांगितलं नाही.

Pixel 9 सीरीजमध्ये 4 मॉडेल्स सादर केले जाऊ शकतात ज्यात Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold चा समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पिक्सलचं लेटेस्ट स्मार्टवॉच Pixel Watch 3 XL देखील लाँच केलं जाऊ शकतं. लाँच इव्हेंटमध्ये लोकांचं लक्ष Android 15 वर देखील असेल. कंपनीची ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम लवकरच युजर्सकडे रोल आउट होण्यास सुरुवात होईल. Android 15 सह कंपनी युजर्ससाठी आधीपेक्षा जास्त ऑप्टिमाइज्ड एक्सपीरियंस घेऊन येऊ शकते.
Google Pixel 8 फोनवर 15 हजारांची सूट; पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर

Google चा आगामी पिक्सल फोन Pixel 9 Pro XL अलीकडेच गीकबेंच लिस्टिंगमध्ये दिसला होता. फोन ‘कोमोडो’ कोडनेमसह लिस्ट करण्यात आला आहे. सेटअपमध्ये 1.95GHz वर चालणारे 4 कोर, 2.60GHz वर चालणारे 3 कोर आणि 3.10GHz वर चालणाऱ्या एका प्रायमरी कोरचा समावेश आहे. यावरून समजले आहे की स्मार्टफोन Tensor G4 चिपसेटवर आधारित असेल. ऑनबोर्डवर Mali-G715 GPU आहे. डेटाबेस लिस्टिंगवरून समजलं आहे की Pixel 9 Pro XL मध्ये 16GB RAM असेल. गुगल लवकरच या नवीन सीरीजचे स्मार्टफोन्स सादर करू शकते.

Source link

pixel 9pixel 9 pro xlpixel 9 seriesगुगल पिक्सल 9 सीरीजगुगल फोनपिक्सल 9
Comments (0)
Add Comment