Car Monthly Pass : चारचाकीसाठी बनणार मासिक पास, पाहा कसा आणि कुठे येणार वापरता

Toll Naka Paas : दैनदिन प्रवासासाठी प्रवाशी रेल्वेचा मासिक पास काढण्याला पंसती देतात, आता असाच काही मासिक पास चारचाकीचा सुद्धा निघण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील टोल साठी चारचाकीचा मासिक पास निघणार आहे. यामुळे टोल चुकवणे अशा गैरप्रकाराला आळा बसेल आणि केंद्रीय सरकारच्या तिजोरीत अधिकची रक्कम जमा होइल. मंगळवारी दिल्लीत ग्लोबल नेविगेशन सेटलाइट सिस्टम आयोजित कार्यशाळा भरवण्यात आली होती, या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान गडकरींनी टोल नाक्यावरील मासिक पास आणि वार्षिक पास संबंधित भाष्य केले.

कसे बनणार चारचाकीचा मासिक पास

केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले मासिक आणि वार्षिक पास करण्याच्या विचार सध्या सुरु आहे. सेक्रेटरी अनुराग जैन आणि एनएतएआई संतोष कुमार यांनी यावर विचार करावा असे गडकरी म्हणाले. मासिक किंवा वार्षिक पासमुळे पैसे पण मिळतील आणि त्रास पण वाचेल, असे सुद्धा गडकरी म्हणालेत त्यामुळे आगामी काळात चारचाकीचा मासिक आणि वार्षिक पास निघेल असे स्पष्ट संकेत केंद्रीय मंत्र्‍यांनी दिले आहेत. काही देशांमध्ये सध्या मासिक पास सुरु आहेत पण मासिक पास टोल नाक्याजवळील व्यक्तींना लागू होतो त्यांचा रहिवाशी ओळखपत्रावरुन दिला जातो.
टाटा-एमजीसह या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारचा मासिक सेल वाढला, टॉप 10 मध्ये कोणत्या गाड्यांचा समावेश, पाहा लिस्ट

सेटेलाइटवर आधारित टोल घेणारे तंत्रज्ञान हायब्रीड मॉडेलवर काम करतंय. ज्यामध्ये टोल नाक्याच्या दोन रांगा सेटेलाइटद्वारे टोल भरणाऱ्या चारचाकीसाठी आहे तर दुसऱ्या दोन रांगा हल्ली सुरु असलेल्या फास्टॅग सिस्टमसाठी आहे. जसेजसे मासिक पासमुळे इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शनचे जाळे वाढेल तसेतसे टोल नाक्यावरील इतर रांगाही सेटेलाइट होतील असा विचार मांडण्यात आला, या कार्यशाळेत अनेक देशातील अनुभवी तंत्रज्ञानी आले होते.

ही संकल्पना देशात लागू झाली तर टोल नाक्यावर चारचाक्या सहजरित्या कोणत्याही वाहतूक समस्येशिवाय ये – जा करु शकतील. याशिवाय लोक कोणत्याही समस्येशिवाय टोल नाक्याचा सुलभ आणि जलदगतीने वापर करु शकतील. या कार्यशाळेत केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि अजय टम्टा सुद्धा उपस्थित होते.

Source link

carfastagfour wheeler monthly passmonthly pass of cartoll plazaकारचारचाकी वाहनेफास्टॅगमहिना पास चारचाकीचा
Comments (0)
Add Comment