लोकसभेत विरोधी पक्ष बळकट होत असताना, ‘या’ राज्यात ६२ आमदारांवर एकगठ्ठा निलंबनाची कारवाई

चेन्नई : लोकसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्ष बळकट होत असल्याचे चित्र असताना तामिळनाडूच्या विरोधी पक्षाबाबत मात्र मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडू विधानसभेतून विरोधी पक्षातील सर्वच आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण पावसाळी अधिवेशन काळापर्यंत निलंबित केले आहे. तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम. अप्पावू यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

६२ आमदारांवर एकगठ्ठा निलंबनाची कारवाई

विधानसभेच्या बुधवारच्या सत्रात विषारी मद्य प्रकरणावरुन सभागृहात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. याआधी मंगळवारच्या सत्रात देखील AIADMKच्या काही आमदारांनी सभागृहाच्या कामात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यानंतर पक्षाच्या आमदारांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी काळे शर्ट परिधान करुन सभागृहात उपस्थिती लावली होती. यादरम्यान त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि विषारी मद्याच्या गंभीर विषयावर चर्चेची मागणी केली. यामुळे तामिळनाडूचे सभापती एम. अप्पावू यांनी पुढील वाद रोखण्यासाठी आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते ई.के. पलानीस्वामी यांच्यासह अखिल भारतीय अन्नाद्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाच्या सर्व ६२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी सभागृहाच्या चालू सत्रामधून संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. कल्लाकुरीची विषारी दारू प्रकरणावर चर्चेची मागणी लावून धरली. विधानसभा अध्यक्षांनी यावर आपण निर्णय घेणार असल्याचे त्यांना सांगितले.

विषारी दारूच्या महत्वाच्या मुद्द्यावर चालढकल न करता आमदारांनी चर्चेचा आग्रह धरला आणि निदर्शनेही केली. यामुळे काही काळ सभागृहाचे वातावरण तापले होते. सभापतींनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना जागेवर बसण्याची विनंती केली तरीही सदस्यांनी आपली निदर्शने चालूच ठेवली. यामुळे अध्यक्षांनी तात्काळ आदेश काढत आमदारांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित केले. याबद्दलचा ठराव सरकारसमक्ष एकमताने मंजूर करण्यात आला.

विधानसभा अध्यक्षांनी ही कठोर कारवाई केल्याने तामिळनाडूच्या विरोधी पक्षामध्ये रोषाचे वातावरण आहे. यामुळे आता वेगळे राजकीय वळण लागणार असल्याची चिन्ह आहेत.

Source link

AIADMKaiadmk news todaybig action in dmk governmenttamilnadu assemblytamilnadu opposition partyएआयएडीएमके पक्षतामिळनाडू विधानसभा अधिवेशनतामिळनाडूची ब्रेकिंग बातमीतामिळनाडूच्या विरोधी पक्षाची बातमीद्रमुक सरकारमधील मोठी कारवाई
Comments (0)
Add Comment