ट्रेनमध्ये अप्पर बर्थ पडल्यानं प्रवाशाचा मृत्यू, मानेची ३ हाडं मोडली; ‘ती’ चूक जीवघेणी ठरली!

नवी दिल्ली: रेल्वेतून प्रवासी करताना अप्पर बर्थची सीट पडल्यानं केरळच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा प्रवासी खाली असलेल्या बर्थवर झोपला होता. रेल्वे मंत्रालयानं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. अप्पर बर्थची सीट व्यवस्थित होती. पण तिला असलेली साखळी नीट लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

केरळच्या एर्नाकुलम आणि दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला. १५ जूनला ट्रेन एर्नाकुलमहून रवाना झाली. ती १७ जूनला हजरत निजामुद्दीनला पोहोचली. ट्रेन तेलंगणामधून जात असताना एस६ कोचमधील एक अप्पर बर्थ खाली कोसळला. त्यामुळे लोअर बर्थवरील प्रवासी जखमी झाला. मरादिक्कल अली खान (६२ वर्षे) असं प्रवाशाचं नाव होतं.
पर्यटनाला येणं पडलं महागात, रस्त्याने बाईक घसरली, डोकं आपटल्याने मृत्यू; एकुलता एक लेक गेल्याने आईचा आक्रोश
अली खान यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वारंगलमधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अप्पर बर्थ कोसळल्यानं खान यांच्या मानेची तीन हाडं मोडली. त्यांना पक्षाघाताचा त्रास सुरु झाला. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्कूल बस ठरली काळ! कॉलेजात जाताना विद्यार्थ्यासोबत अनर्थ, रस्त्यातच गेला जीव; थरारक घटना
आता या प्रकरणात रेल्वे मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. बर्थ चांगल्या स्थितीत होता. पण त्याला टांगण्यासाठी असलेली साखळी नीट लावण्यात आलेली नव्हती. त्यामुळेच अप्पर बर्थ खाली कोसळला, असं रेल्वेनं स्पष्टीकरणात म्हटलं आहे. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचल्यानंतर बर्थची तपासणी करण्यात आली. तो व्यवस्थित होता, असं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Source link

indian railwayrailway accidentrailway commuter diestrain berth fallstrain berth falls on commuterअप्पर बर्थ पडल्याने मृत्यूरेल्वे अपघातरेल्वे प्रवाशाचा मृत्यूरेल्वेत प्रवाशाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment