समुद्र शास्त्रामध्ये शारीरिक रचनेच्या आधारावर अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यावरून भाग्याचा अंदाज लावता येतो. ज्याप्रमाणे हस्तरेषा शास्त्रामध्ये हातावरील रेषा मोजून भाग्यशाली रेषा जाणून घेता येतात, त्याचप्रमाणे समुद्र शास्त्रामध्येही शरीराच्या अवयवांची विशेष रचना नशिबाशी जोडलेली दिसते. उदाहरणार्थ, पायांच्या तळव्यामध्ये अनेक चिन्हे लपलेली असतात, जी व्यक्तीच्या जीवनात राजयोग आहे असे सांगत असतात. चला तर मग जाणून घेऊया पायाचे तळवे पाहून एखाद्या व्यक्तीबद्दल कोणत्या गोष्टी कळू शकतात.
तळवे मजबूत, लाल आणि मुलायम
ज्या व्यक्तींच्या पायाचे तळवे मजबूत, लाल आणि मुलायम असतात ती व्यक्ती धनवान बनते. असे लोक कोणतेही काम करतात, त्यांना फायदाच होतो. याशिवाय, त्यांना पैसे कमविण्याचे मार्ग देखील चांगले माहित आहेत. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता नसते.
तळव्यावर चक्र चिन्ह राजयोगाचा संकेत
ज्या लोकांच्या पायाच्या तळव्यावर चक्र चिन्ह असते त्यांच्या कुंडलीत राजयोग असतो. असे लोक उशिरा का होईना आपल्या जीवनात सर्व सुख-सुविधांचा उपभोग घेतात. त्यांच्याकडे मोठं घर, कार आणि अनेक महागड्या वस्तू असतात.
तळव्यावर धनुष्य आणि शंखाच्या चिन्ह असणारे भाग्यवान
ज्याम लोकांच्या पायाच्या तळव्यावर धनुष्य आणि शंखाची खूण असते ते रातोरात भाग्यवान बनतात. याचा अर्थ असा की सुरुवातीला या लोकांना त्यांच्या मेहनतीचे मोठे फळ मिळत नाही, परंतु अचानक असे काही योगायोग घडतात ज्यामुळे रातोरात या लोकांचे नशीब बदलते.
मासे किंवा घोड्याचे चिन्ह असणाऱ्यांना मिळते उच्च स्थान
समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळव्यावर मासे, घोडा, पर्वत अशी चिन्हे असतात, त्यांना आयुष्यात उच्च स्थान प्राप्त होते. अशा लोकांना आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो. ते पैसे कमविण्यासही सक्षम आहेत, असे लोक क्रिएटीव्ह असतात.
तळव्यावर रथाचे चिन्ह असल्यास व्यवसायात सर्वोत्तम
ज्या लोकांच्या तळव्यावर रथाचे चिन्ह असते ते देखील खूप भाग्यवान मानले जातात. असे लोक बिझनेसमध्ये खूप नाव कमावतात. समुद्र शास्त्रानुसार असे मानले जाते की अशा लोकांमध्ये जन्मापासूनच यशस्वी व्यावसायिक होण्याचे गुण असतात आणि थोड्याफार मेहनतीने असे लोक बिझनेसमध्ये खूप नाव कमावतात.