CMF नं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये CMF Phone 1 चा एक शॉर्ट व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. यात स्मार्टफोनच्या मागे स्क्रू एका स्क्रूड्रायवरने ओपन केला जात आहे. स्क्रूड्रायव्हरचा वापर SIM इंजेक्टर टूल प्रमाणे देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे रिमूव्ह्हेबल बॅक प्लेट असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या स्मार्टफोनमध्ये कस्टमाइजेशन वाढू शकते. यात बॅक प्लेट बदलण्याचा देखील पर्याय मिळू शकतो. हा पर्याय जुन्या मोबाइल फोन्समध्ये असायचा आणि हा PlayStation 5 मध्ये देखील आहे. Nothing नं पोस्ट केल्या एका वेगळ्या व्हिडीओमध्ये एक कम्युनिटी मेंबरनं CMF Phone 1 वर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की युजर्सना या स्मार्टफोनची बॅक प्लेट 3D प्रिंट करण्याची सुविधा देखील मिळू शकते.
हे रिमूव्हेबल प्लेट फक्त दाखवण्यासाठी असेल की याद्वारे स्मार्टफोनची बॅटरी आणि कंपोनेंट्सचा अॅक्सेस देखील मिळेल, हे मात्र स्पष्ट झालं नाही. CMF Phone 1 मध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. यात 50 मेगापिक्सलच्या ड्युअल रियर कॅमेरा यूनिट आणि फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 7300 असू शकतो. यात 128GB आणि 256GB चे दोन स्टोरेज व्हेरिएंट असू शकतात. या स्मार्टफोनची 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.
CMF चे Watch Pro 2 देखील यावर्षी लाँच केले जाऊ शकते. हे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आलेल्या CMF Watch Proची जागा घेईल. CMF नं या स्मार्टवॉच बाबत माहिती दिली नाही. काही रिपोर्ट्सनुसार हा लवकरच बाजारात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. CMF Watch Pro च्या यात अपग्रेड मिळू शकतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या वेबसाइटवर एक स्मार्टवॉच मॉडेल नंबर D398 सह दिसला आहे. हे CMF Watch Pro 2 असू शकते. या स्मार्टवॉचबाबत जास्त माहिती मिळाली नाही.