Madhya Pradesh Cow Slaughter : मध्यप्रदेशमध्ये ‘बुलडोझर’ पॅटर्न, ‘गो’ हत्या करणाऱ्या २ आरोपींचे घरे पडली

भोपाळ : मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्हा प्रशासनाने ‘गो’ हत्येचा आरोप असलेल्या दोन लोकांची बुलडोझरद्वारे घरे पाडली आहेत. ही घरे पूर्णपणे बेकायदेशीर असून परवानगी न घेता बांधण्यात आले होते. आठवडयाभरापूर्वी राज्यातील मांडला जिल्ह्यात 11 घरांवर धाड टाकण्यात आली होती. या घरातून पोलिसांना गोमांस,कातडी सापडले होते.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना जिल्ह्यातील नूराबाद गावातील बंगाली कॉलनीत शुक्रवार (21 जून) रोजी ‘गो’ हत्या केल्याची घटना घडली. अनिपाल गुर्जर नावाच्या गावकऱ्याने गो हत्या करणाऱ्या लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आणि त्याच रात्री पोलिसांचे पथक बंगाली कॉलनीत पोहोचले. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा गोमांसाच्या दोन गोण्यांसह गायीचे कातडे आढळून आले.
शाब्बास! ‘लिव्हर दान’ करून अल्पवयीन मुलगी वाचवणार शेतकरी बापाला, उच्च न्यायालयाची मंजुरी

या संपूर्ण प्रकरणात एकूण ९ आरोपी असून त्यांच्या विरोधात मध्य प्रदेश ‘गो’ हत्या विरोधी कायदा, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता अंतर्गत दंगल आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून तीन जण फरार आहेत.

घरे अनाधिकृत असल्याची माहिती

या संपूर्ण प्रकरणादरम्यान स्थानिक प्रशासनाने आरोपींच्या घरांची पाहणी केली. पाहणीनंतर आरोपींची घरे बेकायदेशीर असून ती परवानगी न घेता बांधण्यात आल्याचं आढळून आले. त्या संदर्भात आरोपींना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतेही उत्तर आले नाही. यानंतर पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या पथकाने दोन्ही आरोपींची घरे बुलडोझर द्वारे जमीनदोस्त केली आहेत.

Source link

cow slaughtercow slaughter newsMadhya Pradeshmadhya pradesh newsगोहत्या प्रकरणमध्यप्रदेशमध्यप्रदेश गोहत्यामध्यप्रदेश गोहत्या प्रकरणमध्यप्रदेश न्यूज
Comments (0)
Add Comment