धावत्या ट्रेनवर बाईकने पाण्याचा फवारा, प्रवासी ओलेचिंब, मात्र टवाळांना लगेच ‘कर्माची’ फळं

इस्लामाबाद : प्रँक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर शेअर करण्याचं जणू फॅडच आलं आहे. असे प्रँक इतरांसाठी निरुपद्रवी असतील तर ठीक, पण काही थट्टा मस्करी एखाद्याच्या अंगलट येण्याची किंवा जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानमध्ये एका टोळक्याने केलेली प्रँक रेल्वे प्रवाशांसाठी तापदायक ठरली. मात्र ‘काळा’ने तात्काळ न्याय केला. कारण ट्रेन थांबली आणि प्रवाशांनी या टवाळखोरांना चोप देत अद्दल घडवली.

नेमकं काय घडलं?

धावत्या ट्रेनवर बाईकच्या मदतीने पाण्याचा फवारा उडवून प्रवाशांना भिजवण्याची अत्यंत गलिच्छ ‘थट्टा’ पाकिस्तानातील एका टोळक्याच्या डोक्यातून शिजू लागली. निव्वळ एक प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणांनी हीनतेची पातळी गाठली.

धावत्या ट्रेनवर पाण्याचा फवारा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुणांनी केलेला प्रँक आणि ‘कर्मा’ची फळं पाहायला मिळत आहेत. काही तरुण रेल्वे ट्रॅकच्या खाली असलेल्या तलावामध्ये बाईक पार्क करताना दिसतात. समोरुन येणाऱ्या ट्रेनवर पाण्याचा फवारा उडवण्याची त्यांची कल्पना होती. ट्रेन थांबणार नाही या अतिआत्मविश्वासाने ते पाण्याचे फवारे उडवत राहिले. मात्र थक्क करणारी गोष्ट पुडे घडते.
Pune Porsche Car Crash : देशाला हादरवणारा ‘निबंध’ लिहावा लागणारच, पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपी शब्दांच्या कचाट्यात

ट्रेन थांबली आणि प्रवासी चरफडत खाली उतरले

व्हिडिओमध्ये दिसतं की अनपेक्षितपणे ही ट्रेन काही क्षणातच थांबली. भिजलेले प्रवासी खाली उतरले. टवाळांनी लागलीच पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त प्रवाशांनी खोड्या करणाऱ्या तरुणांना चोप देत जन्माची अद्दल घडवली. इतकंच नाही, तर पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची बाईकही त्वरीत ताब्यात घेतली. अशा स्टंटबाजांवर रेल्वेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

सोशल मीडियावर संताप

हा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर ऑनलाईन विश्वातही पडसाद उमटताना दिसत आहेत. कुणी हा पाकिस्तानातील रोजचा दिवस आहे म्हणतं, तर कुणी प्रवाशांनी केलेल्या न्यायाबद्दल समाधान व्यक्त केलं. तर कुणी ‘आम्हाला वाटलं हे ट्रेन धुत आहेत’ अशी उपरोधिक प्रतिक्रियाही व्यक्त केली.

Source link

marathi newspakistan bike splashes water on trainpakistani men prank videoprank gone wrongपाकिस्तान प्रँक व्हिडिओपाकिस्तान बाईक ट्रेन पाणी फवाराप्रँक व्हिडिओ चूक
Comments (0)
Add Comment